भारतीय हवामान खात्याची मोठी घोषणा ! मान्सून ‘या’ तारखेपासून सुरू करणार परतीचा प्रवास

आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात देखील एक नवीन अपडेट दिली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका कधी सुरू होणार या संदर्भात हवामान खात्याने माहिती दिली आहे.

Monsoon 2024 News

Monsoon 2024 News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण गत दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानासहित काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने उद्यापासून अर्थातच 21 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार असा अंदाज दिला आहे.

आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात देखील एक नवीन अपडेट दिली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका कधी सुरू होणार या संदर्भात हवामान खात्याने माहिती दिली आहे.

खरंतर काही हवामान तज्ञ यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार तर काही हवामान तज्ञ यंदाही मान्सूनचा परतीचा प्रवास वेळेवरच सुरू होणार असे म्हणत होते. हवामान तज्ञांमध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासासंदर्भात मतमतांतरे पाहायला मिळाली होती. मात्र, आता भारतीय हवामान खात्याने परतीच्या पावसाची तारीख जाहीर केली आहे.

कधी सुरू होणार परतीचा पाऊस?

खरे तर, दरवर्षी 19 सप्टेंबरच्या सुमारास राजस्थान सहित वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असते. यंदा मात्र हा प्रवास चार दिवस उशिराने सुरू होणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे यावर्षी 23 सप्टेंबर पासून परतीचा पाऊस सुरू होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थानच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे कच्छमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे.

पश्चिम राजस्थानचा काही भाग आणि कच्छ येथे ही स्थिती दिसून आल्याने मान्सून 23 सप्टेंबरपासून या दोन्ही भागांतून परतीच्या प्रवासाला निघणार अशी मोठी घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली आहे.

आज उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरात वरच्या हवेत चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे 21 ते 25 सप्टेंबरदम्यान राज्यात सर्वत्र पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे.

मात्र, या काळात राज्यात सर्व दूर पाऊस पडणार असला तरी देखील पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. अगदीच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. अर्थातच सर्वत्र सारखा पडणार नाही.

आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे 24 आणि 25 रोजी मध्य महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा व विदर्भात 25 व 26 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून परतीचा पाऊस कधीपासून सुरू होणार? असा सवाल विचारला जात होता. दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने येत्या तीन दिवसांनी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार अशी घोषणा केली असल्याने सर्वसामान्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe