Pm Kisan Sanman Nidhi Yojana : केंद्र आणि राज्य शासनाचा माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेकडो योजना राबवल्या जात आहेत. 2014 मध्ये दिल्ली दरबारी सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारने देखील देशभरातील शेतकऱ्यांसाठी अशाच काही नवनवीन योजना सुरू केल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. मात्र, हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते.

आतापर्यंत या योजनेचे एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आगामी अठराव्या हफ्त्यासंदर्भात देखील एक नवीन अपडेट समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील अठरावा हप्ता हा पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
आगामी नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा मोठा सण पाहता पीएम किसान योजनेचा अठरावा हफ्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नक्कीच ऑक्टोबर मध्ये जर या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून या योजने संदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पीएम किसान योजनेच्या तेरा हजार 335 शेतकऱ्यांची खाती आधार लिंक झालेली नाहीत. सध्या जिल्ह्यातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. शासकीय आकडेवारीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख 65 हजार 950 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
विशेष म्हणजे जे शेतकरी चुकीने अपात्र झाले आहेत त्यांना देखील पात्र करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील लाभार्थी संख्या देखील वाढणार आहे. जिल्ह्यातील चार हजार 99 शेतकऱ्यांची एक ए वाय सी ची प्रक्रिया पेंडिंग आहे. तसेच 13,353 शेतकऱ्यांनी आपले बँक अकाउंट आधार सोबत लिंक केलेले नाहीत.
ज्या शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आधार सोबत लिंक नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले बँक अकाउंट आधार सोबत लिंक करावे अशा सूचना कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
जर शेतकऱ्यांनी आपले बँक अकाउंट आधार सोबत लिंक केले नाही तर त्यांना पीएम किसान योजनेचा पुढील अठरावा हप्ता मिळणार नाही. अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसणाऱ्या शेतकऱ्यांनी जर हे काम केले नाही तर त्यांना देखील पुढील हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.