Most Engineering Colleges : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीनंतर अनेक जण उच्च शिक्षणासाठी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतात.
दरम्यान जर तुम्हालाही बारावीनंतर इंजीनियरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खास ठरणार आहे. आज आपण देशात सर्वात जास्त इंजीनियरिंग कॉलेज कोणत्या राज्यात आहेत याची माहिती पाहणार आहोत. खरेतर, भारतात अभियांत्रिकी शिक्षणाचा विस्तार गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने झाला आहे.

अनेकांना इंजीनियरिंगमध्ये करिअर करायचे असते. दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात. हेच कारण आहे की देशात इंजीनियरिंग कॉलेजची संख्या देखील फारच अधिक आहे. पण तुम्हाला भारतात सर्वात जास्त इंजीनियरिंग कॉलेज कोणत्या राज्यात आहेत या यादीत आपल्या महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो या संदर्भात माहिती आहे का? नाही.
मग आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर सद्यस्थितीला आपल्या देशात 8000 पेक्षा ही जास्त इंजीनियरिंग कॉलेज आहेत. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) या संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापैकी बहुतांशी कॉलेजेस खाजगी आहेत.
देशात जवळपास 6000 इंजिनिअरिंग कॉलेजेस प्रायव्हेट आहेत आणि उर्वरित 2000 कॉलेजेस सरकारी आहेत. देशभरातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये B.Tech, M.Tech अशा वेगवेगळ्या ब्रॅंचेस मध्ये शिक्षण दिले जात आहे.
इंजीनियरिंगचे विविध अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत आणि लाखो विद्यार्थी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. Ai शी निगडित अभ्यासक्रम देखील आता या इंजीनियरिंग कॉलेजेस मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
भारतातील सर्वाधिक इंजिनिअरिंग कॉलेज असणारे राज्य
तामिळनाडू : या राज्यात सर्वाधिक 892 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. यामुळे तामिळनाडू राज्याचा या यादीत पहिला क्रमांक लागतो. गेल्या दोन दशकांत येथील इंजीनियरिंग कॉलेजेसची संख्या प्रचंड वाढली आहे.
महाराष्ट्र : आपले महाराष्ट्र सुद्धा या यादीत येते. महाराष्ट्रात एकूण 698 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि या यादीत राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. राज्यातील मुंबई पुणे नागपूर येथे देशातील प्रमुख इंजीनियरिंग कॉलेजेस आहेत. या कॉलेजेस मध्ये देश-विदेशातील लाखो विद्यार्थी शिक्षणाला आहेत.
उत्तर प्रदेश : या यादीत यूपीचा सुद्धा नंबर लागतो. यूपीचा या यादीत तिसरा नंबर लागत असून येथे 601 इंजिनिअरिंग कॉलेजेस तयार झालेली आहेत.
कर्नाटक : आपल्या शेजारील राज्य कर्नाटक सुद्धा इंजीनियरिंग कॉलेजेस च्या बाबतीत टॉप 4 मध्ये येते. येथे एकूण 526 इंजिनिअरिंग कॉलेजेस ओपन झालेली आहेत.
आंध्र प्रदेश : आंध्रप्रदेश राज्यात सुद्धा 406 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि देशातील सर्वाधिक इंजिनिअरिंग कॉलेजच्या यादीत या राज्याचा पाचवा नंबर लागतो.
मध्य प्रदेश : या यादीत mp चा सहावा नंबर लागतो येथे एकूण 272 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.
तेलंगणा : या राज्यात एकूण 269 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि हे राज्य या यादीत सातव्या क्रमांकावर येते.
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये एकूण 227 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. यामुळे हे राज्य या यादीत आठव्या क्रमांकावर येते.
राजस्थान : पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असणारे राजस्थान शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे. राजस्थानचे कोटा हे शहर कोचिंग साठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. याशिवाय या राज्यात एकूण 220 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. यामुळे देशातील सर्वाधिक इंजिनिअरिंग कॉलेजच्या यादीत हे राज्य नवव्या क्रमांकावर येते.













