मोतीलाल ओसवालने सुचवलेले ‘हे’ 9 स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त परतावा, लॉंगटर्म मध्ये मिळणार 49 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न !

ग्लोबल ट्रिगरमुळे देशांतर्गत शेअर बाजारात सुधारणा होत असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. मात्र, तरीही शेअर बाजारात वॉलेटिलिटी पाहायला मिळत आहे. दरम्यान, शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहे. तसेच काही कंपन्यांकडून बोनस शेअर दिले जात आहे.

Tejas B Shelar
Published:

Motilal Oswal 9 Stock To Buy : एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजारात थोडीशी मंदी दिसली. सोमवारी शेअर बाजार आपटला मात्र मंगळवारी यात रीकव्हरी झाली. तेव्हापासून शेअर बाजारात सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे. आजही भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. ग्लोबल ट्रिगरमुळे देशांतर्गत शेअर बाजारात सुधारणा होत असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.

मात्र, तरीही शेअर बाजारात वॉलेटिलिटी पाहायला मिळत आहे. दरम्यान, शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहे. तसेच काही कंपन्यांकडून बोनस शेअर दिले जात आहे. याशिवाय केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.

याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता शेअर बाजारातील काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील असा विश्वास स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. आगामी काळात शेअर बाजारात सूचीबद्ध असणारे काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न देतील असे म्हटले जात आहे. कंपन्यांचे त्रैमासिक निकाल, कॉर्पोरेट अद्यतनांमुळे बरेच स्टॉक गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून आकर्षक दिसत आहेत.

कमकुवत बाजारात, ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी सुद्धा काही निवडक शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊस ने सुचवलेले हे स्टॉक आगामी काळात तब्बल 49 टक्क्यांपर्यंत रिटर्न देतील असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आज आपण मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजकडून सुचवण्यात आलेल्या स्टॉकची माहिती पाहणार आहोत.

आदित्य बिर्ला कॅपिटल : हा शेअर 39% वाढीसाठी खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या स्टॉक साठी 240 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवण्यात आली आहे. या स्टॉकचा 52 आठवडे चा उच्चांक 287 रुपये आणि 52 आठवड्याचा निचाँक 163 रुपये आहे.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स : मोतीलाल ओसवाल ने एलआयसी हाऊसिंग फायनान्स वर सकारात्मक आउट लुक दिली आहे. यासाठी बाय रेटिंग देण्यात आली असून टारगेट प्राईज 690 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्टॉक 24% रिटर्न देणार असे म्हटले जात आहे.

ONGC : ओएनजीसी स्टॉक साठी मोतीलाल ओसवाल ने बाय रेटिंग दिलेली आहे. यासाठी 365 रुपयांचे टार्गेट प्राईज ठेवण्यात आले आहे. 4 फेब्रुवारीला स्टॉकच्या क्लोजिंग प्राइसपेक्षा ही टार्गेट प्राईज 22% पेक्षा अधिक आहे.

त्रिवेणी टरबाइन : Triveni Turbine चा स्टॉक आणखी तेजीत येणार आहे. मोतीलाल ओसवाल ने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे. यासाठी 780 रुपयांचे टार्गेट प्राईज ठेवण्यात आले असून सध्याच्या किमतीपेक्षा ही टार्गेट प्राईज 22% पेक्षा अधिक आहे.

Gland Pharma : हा फार्मा स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असे दिसते. मोतीलाल ओसवालने यासाठी बाय रेटिंग दिली आहे. यासाठी 1840 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे. हा स्टॉक तब्बल 22 टक्के रिटर्न देणार असे म्हटले जात आहे.

Nuwama Wealth : या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने खासगी संपत्ती आणि भांडवली बाजारपेठांमध्ये प्रचंड शानदार कामगिरी केली आहे. नुवामाच्या ऑपरेटिंग रेव्हेन्यूमध्ये वर्षाकाठी 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर भांडवली बाजाराच्या उत्पन्नात 46% वाढ झाली आहे. म्हणून या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 33% परतावा मिळू शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मोतीलाल ओसवाल कडून या स्टॉक साठी 6800 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे.

GR Infraprojects : हा इन्फ्रा सेक्टर मधील स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देणार आहे. खरेतर या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या कंपनीने तिसर्‍या तिमाहीत एक्जीक्यूशन कमकुवत दाखवले आहे, परंतु त्याची ऑर्डर पाइपलाइन मजबूत आहे. ऑर्डर बुक देखील मोठे आहे. ईबीआयटीए मार्जिन बाजाराच्या अंदाजापेक्षा किंचित चांगले आहे. यामुळे या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. यासाठी मोतीलाल ओसवाल कडून 1410 रुपयांची टार्गेट प्राईस ठेवण्यात आली आहे.

Godrej Agrovet : या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज कडून हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 23 टक्क्यांनी वाढू शकतो असा दावा करण्यात आला आहे. या स्टॉक साठी 940 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

Vinati Organics : या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. यासाठी 2600 रुपयांची टार्गेट प्राईज देण्यात आली आहे. यातून गुंतवणूकदारांना 49 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळणार असा दावा मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज कडून करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe