MP Nilesh Lanke : अहिल्या नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या वक्तव्यामुळे निलेश लंके प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने झळकत असतात. दरम्यान निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार लंके यांनी आपल्याला कपड्यांपासून ते घड्याळापर्यंत सर्वकाही कार्यकर्त्यांकडून मिळतं असा दावा केला आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या पगाराचे ते करतात काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान आता याच बाबत खासदार लंके यांनी मोठी माहिती दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आपल्या देशातील लोकप्रतिनिधींना म्हणजेच आमदार आणि खासदारांना सरकारकडून एका लाखापेक्षा अधिक पगार मिळतो तसेच त्यांना विविध भत्यांसह पेन्शन देण्याचे प्रावधान सुद्धा आहे.
देशातील खासदारांबाबत बोलायचं झालं तर गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्रातील सरकारने खासदारांचा पगार, भत्ता तसेच पेन्शन मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार खासदारांना सध्या दरमहा 1.24 लाख एवढा पगार मिळत असून दैनंदिन भत्ता म्हणून त्यांना पंचवीसशे रुपये मिळतात.
पेन्शनमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली असून आता खासदारांना 31 हजार रुपये प्रति महिना एवढी पेन्शन मिळते. मात्र लंके यांना मिळणारा पगार ते स्वतः घेत नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. एका खाजगी वृत्त संस्थेच्या मुलाखतीत लंके यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आपल्याला मिळणारा पगार आपण घेत नाही असा दावा लंके यांनी केला असून सध्या त्यांच्या या दाव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लंके यांनी आपल्याला मिळणारा खासदारकीचा पगार किंवा मानधन आपण घेत नाही असे एका मुलाखतीत स्पष्ट केले. यामुळे त्यांना मिळणारा पगार कुठे जातो? अशी विचारणा झाली आणि यावर उत्तर देताना लंके यांनी मोठी माहिती दिली आहे.
लंके यांचा पगार कुठे जातो?
लंके सांगतात की, त्यांना मिळणारा पगार लंके यांच्या एका संस्थेला अर्थात लंके प्रतिष्ठानला जातो. या ठिकाणी लंके यांच्या खासदारकीच्या पगारासह जमा होणारा निधी अनाथ मुला-मुलींसाठी वापरला जातो.
याबाबत बोलताना लंके यांनी असे म्हटले की, ज्या मुलांना आई-वडीलच नाहीत, जे निराधार आहेत किंवा ज्या आई-वडील आहेत पण ते त्यांना शिकवण्यास असमर्थ आहेत अशांच्या शिक्षणासाठीचा खर्च आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो.
लंके यांचे प्रतिष्ठान कोणतीही मर्यादा न आखता शिक्षण आणि आरोग्याच्या समस्येवर काम करत आहे. महत्वाची बाब अशी की लंके प्रतिष्ठान मतदार संघाचा विचार न करता मदत करत असते.
म्हणजेच फक्त नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी या पैशांचा वापर होत नाही तर नांदेड असो किंवा सिंधुदुर्ग अशा विविध भागांमधील अनाथांच्या समस्येसाठी लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत केली जाते. एवढेच नाही तर लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुसऱ्या राज्यातल्या गरजू लोकांना सुद्धा मदत केली जाते.
तसेच प्रतिष्ठान फक्त अनाथ निराधारांनाच मदत करते असे नाही तर अपंगाना देखील जास्तीत जास्त मदत प्रतिष्ठानकडून केली जाते, अशी माहिती खासदार लंके यांनी यावेळी दिली आहे. याच कारणांमुळे खासदार लंके स्वतःच्या पगाराची रक्कम स्वतः घेत नाही तर ते प्रतिष्ठान कडे वर्ग करतात.