MPSC Exam News : महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जर तुम्हीही एमपीएससी साठी तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाचे ठरणार आहे. खरे तर राज्यातील लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षांसाठी तयारी करतात. दरवर्षी यातील हजारो लोकांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होते तर काही उमेदवारांचे स्वप्न भंगते.
पण तरीही उमेदवार एमपीएससीच्या परीक्षेसाठी तयारी करत असतात. एमपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वाधिक कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरम्यान आता याच स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आयोगाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त हाती आले आहे.

या निर्णयामुळे आता काही उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण आयोगाने नेमका काय निर्णय घेतला आहे आणि याचा काय इम्पॅक्ट पडणार याची सविस्तर माहिती या लेखातून आज आपण समजून घेणार आहोत.
आयोगाने घेतलेला निर्णय नेमका काय?
आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जे दिव्यांग उमेदवार एमपीएससीच्या भरतीसाठी अर्ज करतील त्या दिव्यांग उमेदवारांना भरती मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्याच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. माहितीनुसार, दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील एमपीएससी मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र आणि यूडीआयडी आयडी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
महत्वाचे म्हणजे जर दिव्यांग उमेदवारांकडे हे प्रमाणपत्र नसेल तर अशा दिव्यांग उमेदवारांना दिव्यांग असताना सुद्धा एमपीएससीच्या भरतीमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती संबंधितांकडून समोर आली आहे. केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वितरित होणारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि यूडीआयडी कार्ड जर दिव्यांग उमेदवाराकडे नसेल तर त्यांना एमपीएससी भरतीमध्ये प्रवेश घेता येणार नाही.
महत्वाची बाब अशी की या निर्णयाची अंमलबजावणी पुढील महिन्यापासूनच करण्याचा निर्णय आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व भरती प्रक्रियेत करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय 1 मे 2025 पासून लागू होणार असल्याने यापुढील सर्वच भरती प्रक्रियेत आता दिव्यांग उमेदवारांना या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे आणि हे प्रमाणपत्र मिळवणे त्यांच्यासाठी आवश्यक राहणार आहे.
महत्वाची बाब अशी की, एमपीएससीच्या ऑनलाईन अर्जप्रणालीत दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांच्या खात्यात यूडीआयडी कार्ड क्रमांक नोंदविण्याची व त्यास ‘स्वावलंबन पोर्टल’ वरून वैधता मिळविण्याची सुविधा सुद्धा आधीच उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे.