मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर

Published on -

Mukesh Ambani House Staff : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. विशेषता ज्यांना राजधानी मुंबईत नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

खरंतर अनेकांना मुकेश अंबानी यांच्या बंगल्यावर नोकरीं करायची असेल, तुम्ही सुद्धा अशी तयारी करत असाल तर आज आपण अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांची नोकर भरती कशी होते, येथील कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो अशा काही महत्त्वाच्या बाबींची माहिती पाहणार आहोत.

खरेतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हे मागे जगभरातील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये सामील झाले होते. ते काही काळ टॉप फाईव्ह श्रीमंतांच्या यादीत सुद्धा होते.

उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या श्रीमंतीसाठी तर जगभरात प्रसिद्ध आहेत या सोबतच ते आणखी एका कारणास्तव संपूर्ण जगात ओळखले जातात आणि ते कारण म्हणजे त्यांचा अँटिलिया बंगला. मुंबईतला हा बंगला जगातील सर्वात मोठे खाजगी मालकीचे घर आहे.

हे आलिशान खासगी निवासस्थान 27 मजली आहे. दरम्यान या भव्य इमारतीत काम करण्याची इच्छा अनेकांची असते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारा लाखोंचा पगार, कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधा आणि सुरक्षित भविष्य दिले जाते.

अँटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती ही अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोर प्रक्रियेतून केली जाते. बहुतांश वेळा नामांकित ह्युमन रिसोर्स एजन्सींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते. काही प्रसंगी विशिष्ट पदांसाठी वर्तमानपत्रांमधून जाहिरातीही दिल्या जातात.

मात्र, थेट अर्ज करून नोकरी मिळणे फारच दुर्मिळ मानले जाते. येथे नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण, अनुभव आणि संबंधित कामाची प्रमाणपत्रे खूप महत्त्वाची असतात. उदाहरणार्थ, शेफ किंवा कूक पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची हॉटेल मॅनेजमेंट किंवा कुलिनरी आर्ट्समधील पदवी असणे आवश्यक असते.

ड्रायव्हर, पर्सनल अटेंडंट, हाऊसकीपिंग किंवा सुरक्षा रक्षक यांसारख्या पदांसाठीही ठराविक शिक्षण, अनुभव आणि पार्श्वभूमी तपासणी केली जाते. भरती प्रक्रियेत प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत सामान्य ज्ञान तसेच संबंधित पदाशी निगडित प्रश्न विचारले जातात.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर संबंधित भूमिकेनुसार कौशल्य चाचणी घेतली जाते. अंतिम निवडीपूर्वी वैद्यकीय तपासणी अनिवार्य असते. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

अँटिलियामध्ये सुमारे 600 ते 700 कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. यामध्ये शेफ, हाऊसकीपिंग स्टाफ, सुरक्षा रक्षक, पर्सनल अटेंडंट, ड्रायव्हर आदींचा समावेश आहे. या बंगल्यात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांचा पगार दिला जातो अशी माहिती समोर आली आहे.

पगारासोबतच अँटिलीया मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही खास सुविधा पण दिल्या जातात. अँटिलियामध्येच राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या, वैद्यकीय विमा, आरोग्य सुविधा, पीएफ, विमा योजना तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत अशा सुविधा पुरवण्यात येतात अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News