Mukesh Ambani News : ‘फोर्ब्स’ ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली. या यादीनुसार मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुकेश अंबानी हे फक्त भारतातीलच नाहीत तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.
एकेकाळी ते जगातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांच्या यादीत सुद्धा होते. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीत थोडी घट झाली आहे. पण असे असतानाही ते आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 111.5 बिलियन डॉलर इतकी आहे. ते भारतातील एकमेव श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांची नेटवर्थ 100 बिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत ते 18व्या नंबरवर आहेत.
दरम्यान आज आपण रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नावावर किती कंपन्या आहेत आणि त्यांची महिन्याची कमाई किती आहे याची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.
मुकेश अंबानी यांच्या नावावर किती कंपन्या आहेत?
मीडिया रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस, नेटवर्क18, Viacom 18, जिओ हॉटस्टार, जिओ सावन नेटवर्क, डेन नेटवर्क्स, हॅथवे केबल आणि डेटाकॉम, इंडिपेंडेंस या कंपन्यांची मालकी सांभाळतात.
एवढेच नाही तर GTPL हॅथवे, नेटमेड्स, रिलायंस इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर, जस्ट डायल, आलोक इंडस्ट्रीज, स्टर्लिंग एंड विल्सन रिन्यूऐबल एनर्जी, अर्बन लॅडर या कंपनीचा कारभार देखील अंबानी यांच्याकडेच आहे.
याव्यतिरिक्त मीडिया रिपोर्ट मधून कॅम्पा कोला, जिओ मार्ट, अजिओ, रिलायंस ट्रेंड्स, स्मार्ट बाजार, टीरा ब्यूटी, रिलायंस फ्रेश, रिलायन्स रिटेल या कंपन्यांचा व्यवसाय देखील मुकेश अंबानी सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे.
सोबतच रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, इन्फोमीडिया प्रेस, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, रिलायन्स लाइफ सायन्सेस, रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्वेस्टमेंट्स अशा कंपन्या सुद्धा मुकेश अंबानी यांच्या नावावर आहेत अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचा विस्तार सातत्याने वाढत आहे. म्हणजेच आगामी काळात आणखी काही कंपन्या मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या बनतील हे नक्की आहे.
मुकेश अंबानी यांची एका दिवसाची कमाई किती?
काल 20 जुलै 2025 रोजी मुकेश अंबानी यांच्या नावावर 111.5 बिलियन डॉलर इतकी संपत्ती होती. ते भारतातील एकमेव असे उद्योगपती आहेत ज्यांची संपत्ती 100 बिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे मुकेश अंबानी हे एका दिवसात 163 कोटी रुपयांची कमाई करतात.