‘ह्या’ तारखांना जन्मलेल्या लोकांनी कोणतेही शुभ कार्य सोमवारी करावे ! अशक्य पण होणार शक्य, या लोकांसाठी पांढरा रंग आहे शुभ

अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मुलांक काढला जातो. आणि या मुलांकावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची आणि स्वभावाची माहिती मिळत असते. दरम्यान आज आपण मुलांक दोन असणाऱ्या लोकांची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Mulank 2 : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. हे शास्त्र असे सांगते की, व्यक्तीच्या केवळ जन्म तारखे वरून त्याचा भूत, भविष्य आणि वर्तमान काळ सांगितला जाऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या परिस्थितींचा सामना करावा लागेल, त्याचे भविष्य उज्ज्वल असेल की त्याला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल हे सार काही आपण ज्योतिष शास्त्रातून जाणून घेत असतो.

या गोष्टी आपल्याला अंकशास्त्रातून देखील समजू शकतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून या सर्व गोष्टी समजतात.

अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक काढता येतो आणि मुलांक वरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, आवडी-निवडी, गुण-अवगुण जाणून घेता येतात. दरम्यान आज आपण अशाच एका मुलांकाची माहिती जाणून घेणार आहोत. 

मुलांक कसा काढला जातो ?

अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरून मुलांक काढला जातो. जर समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म विस्तार केला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक 2+0 = 2 असतो. जर व्यक्तीचा जन्म 31 तारखेला झालेला असेल तर त्याचा मुलांक 3+1 =4 असतो.

दरम्यान आज आपण दोन मुलांक असणाऱ्या लोकांची विशेषता जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक दोन असतो. या मुळांकाचा स्वामी ग्रह चंद्र असतो. हे लोक फारच संवेदनशील, भावनात्मक आणि शांत व्यक्तिमत्वाचे असतात. 

मुलांक 2 असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

मुलांक 2 च्या लोकांमध्ये चंद्राचे गुण असतात. कारण की, चंद्र त्यांचा स्वामी ग्रह आहे, ज्यामुळे ते स्वभावाने खूप भावनिक आणि जास्त विचार करणारे असतात. या लोकांमध्ये मूड स्विंग मोठ्या प्रमाणात होतात.

ज्याप्रमाणे चंद्राचा आकार बदलत राहतो, त्याचप्रमाणे त्यांचा स्वभावही बदलत राहतो असे बोलले जाते. मात्र हे लोक फारच केअरिंग स्वभावाचे असतात. इतरांची काळजी घेणे, माया दाखवणे ही या लोकांची विशेषता असते.

हे लोक आपल्या परिवाराचा आणि मित्रांचा आदर ठेवतात आणि नेहमीच त्यांची काळजी घेत असतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांच्या पाठीशी उभे राहतात. या लोकांची क्रिएटिव्हिटी यांना इतरांपेक्षा वेगळ बनवते. शिक्षणात देखील हे लोक हुशार असतात आणि चांगले करिअर घडवतात. 

हा दिवस असतो शुभ 

 या लोकांसाठी सोमवारचा दिवस विशेष शुभ असतो. या लोकांवर महादेवाची कृपा असते आणि म्हणूनच सोमवारचा दिवस या लोकांसाठी विशेष शुभ असल्याचे सांगितले जाते. यामुळे मुलांक दोन असणाऱ्या लोकांनी कोणतेही काम सोमवारच्या दिवशी करायला हवे असे बोलले जाते.

या लोकांनी सोमवारच्या दिवशी महत्त्वाची कामे करायला हवीत. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो सोमवारीच घ्यायला हवा असे केल्याने यांना शंभर टक्के यश मिळते. या लोकांसाठी पांढरा कलर विशेष शुभ असतो. या लोकांनी भगवान शंकराची पूजा करायला हवी तसेच कोणत्याही पांढऱ्या वस्तूंचे दान करायला हवे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe