काय सांगता ! कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तीन तारखांना जन्मलेले लोक असतात फारच रागीट, तुमच्या घरात पण कोणी आहे का ?

अंकशास्त्रात मुलांकाला फार महत्त्व असतं. मुलांक म्हणजेच जन्मतारखेची बेरीज. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 27 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक 2+7 = 9 राहणार आहे. दरम्यान आज आपण मुलांक 9 असणाऱ्या लोकांच्या स्वभावाची माहिती पाहणार आहोत.

Updated on -

Mulank 9 : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असून अंकांच्या आधारावर व्यक्तीचे वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य सांगितले जाते. फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या संपूर्ण आयुष्याची जन्म कुंडली समोर येते.

अंकशास्त्रात मुलांकाला फार महत्त्व असतं. मुलांक म्हणजेच जन्मतारखेची बेरीज. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 27 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक 2+7 = 9 राहणार आहे.

मुलांक हा एक ते नऊ दरम्यानच असतो. दरम्यान याच एक ते नऊ मुलांक असणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्वाचे सविस्तर वर्णन आपल्याला अंकशास्त्रात पाहायला मिळते. दरम्यान आज आपण मुलांक 9 असणाऱ्या लोकांच्या स्वभावाची माहिती पाहणार आहोत.

या लोकांचा स्वभाव कसा असतो, या लोकांचे व्यक्तिमत्व आणि इतर बाबी याबाबत अंकशास्त्रात काय वर्णन आहे याच संदर्भात आता आपण माहिती जाणून घेऊयात.

कसा असतो मुलांक 9 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव

कोणत्याही महिन्याच्या म्हणजे जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत कोणत्याही महिन्याच्या नऊ, अठरा किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा 9 असतो. या लोकांवर मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो.

मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे या लोकांमध्ये धाडस अन आत्मविश्वास इतरांच्या तुलनेत अधिक असतो. हे लोक मोठे शक्तिशाली असतात. धाडसाने निर्णय घेतात. हे लोक आपल्या आयुष्यात खूपच यशस्वी होतात. आर्मी, पोलीस किंवा क्रीडा क्षेत्रात हे लोक मोठे नाव कमवतात.

या क्षेत्रात नऊ मुलांक असणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळते. या क्षेत्रात जर हे लोक उतरले तर शंभर टक्के यशस्वी होण्याची शक्यता असते. कशीही कठीण परिस्थिती असूद्यात हे लोक कधीच घाबरत नाहीत.

याच धाडसी स्वभावामुळे हे लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात पण या लोकांचा एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. तो म्हणजे हे लोक फारच रागीट असतात. अगदीच छोट्याशा गोष्टीवरून या लोकांना राग येतो.

पण या लोकांचा राग जेवढा भयंकर तेवढेच हे लोक प्रेमळ सुद्धा असतात. आपल्या आई-वडिलांवर, आप्तेष्टांवर, मित्रांवर या लोकांचा खूपच जीव असतो. एकंदरीत रागीट स्वभाव वगळता या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व फारच रॉयल असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe