6 महिन्यात दिले 400% रिटर्न ! ‘हे’ 5 पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल

आज आपण गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळवून देणाऱ्या टॉप पाच पेनी स्टॉकची माहिती पाहणार आहोत. ईस्ट इंडिया ड्रम्स, फोन 4 कम्युनिकेशन्स, प्रो फिन कॅपिटल, ब्रिज सिक्युरिटीज आणि क्वासर इंडिया या पाच शेअर्सनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल 200 ते 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Published on -

Multibagger Penny Stocks : आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली.

पण, भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवरही काही पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. दरम्यान आज आपण गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळवून देणाऱ्या टॉप पाच पेनी स्टॉकची माहिती पाहणार आहोत.

ईस्ट इंडिया ड्रम्स, फोन 4 कम्युनिकेशन्स, प्रो फिन कॅपिटल, ब्रिज सिक्युरिटीज आणि क्वासर इंडिया या पाच शेअर्सनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल 200 ते 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

ईस्ट इंडिया ड्रम्स – 465% परतावा

ईस्ट इंडिया ड्रम्स अँड बॅरल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडने गेल्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 465.88% परतावा दिला आहे. यावर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये 62.5% वाढ झाली आहे. बीएसईमध्ये हा शेअर 4.96% वाढीसह 19.24 रुपयांवर बंद झाला.

फोन 4 कम्युनिकेशन्स – 223% परतावा

फोन 4 कम्युनिकेशन्स (इंडिया) लिमिटेडने सहा महिन्यांत 223.20% तर वर्षभरात 181.49% परतावा दिला आहे. मात्र, बीएसईमध्ये शेवटच्या सत्रात हा शेअर 4.99% घसरून 16.58 रुपयांवर बंद झाला.

प्रो फिन कॅपिटल – 367% परतावा

प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडने गेल्या सहा महिन्यांत 367% तर वर्षभरात 191% एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. बीएसईमध्ये हा शेअर 0.67% वाढीसह 4.49 रुपयांवर ट्रेड करत होता.
ब्रिज सिक्युरिटीज – 239% वाढ
ब्रिज सिक्युरिटीजने सहा महिन्यांत 239.57% वाढ नोंदवली असून, यावर्षी आतापर्यंत 18.36% परतावा दिला आहे. शेवटच्या सत्रात हा शेअर 1.03% वाढीसह 12.70 रुपयांवर बंद झाला.

क्वासर इंडिया – 196% परतावा

क्वासर इंडियाने सहा महिन्यांत 196% आणि वर्षभरात 114% वाढ नोंदवली आहे. मात्र, बीएसईमध्ये शेवटच्या सत्रात हा शेअर 4.52% घसरून 1.48 रुपयांवर बंद झाला.
या 5 पेनी स्टॉक्सने ज्या प्रकारे मोठा परतावा दिला आहे, त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष या कंपन्यांकडे वेधले आहे. मात्र, अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पेनी स्टॉक्स उच्च जोखीम घेऊन येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe