Multibagger Stock | 3 वर्षात 3300% रिटर्न, 1 लाखाचे झालेत 34 लाख, हा शेअर तुमच्याकडे आहे का ? पहा…

Tejas B Shelar
Published:

Multibagger Stock | भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतोय. मात्र शेअर बाजारातील या घसरणीच्या काळातही काही गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांकडून गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळाला आहे.

यामुळे घसरणीच्या काळातही काही लोक लखपती बनले आहेत. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अशाच एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल 3300% रिटर्न दिले असून यामुळे यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साहात दिसत आहेत.

ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या एन बी एफ सी कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षांच्या काळात चांगले दमदार रिटर्न दिलेले आहेत. या स्टॉकने गुंतवणूकदारांच्या एका लाखाचे 34 लाख बनवले आहे. यामुळे हा स्टॉक मल्टिबॅगर स्टॉक बनला असून आज आपण या स्टॉकची सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेसचा स्टॉक ठरला कुबेरचा खजाना

ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेसचा गेल्या तीन वर्षांमध्ये 3300% वाढला आहे अन गेल्या दोन वर्षांमध्ये या स्टॉकच्या किमती 483 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ही कंपनी पर्सनल आणि बिझनेस लोन ऑफर करत आहे.

3 वर्षांपूर्वी अर्थातच 14 फेब्रुवारी 2022 रोजी BSE वर या शेअरची किंमत 6.08 रुपये इतकी होती. मात्र 14 फेब्रुवारी 2025 रोजी हा शेअर 210 रुपयांवर क्लोज झाला. यादरम्यान या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 3353.95 टक्के परतावा दिलाय.

2 लाखाचे 68 लाख झालेत

ध्रुव कॅपिटल सर्विसेसचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी कुबेर चा खजाना ठरला आहे कारण की जर एखाद्याने 3 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 25,000 रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअर्स विकले नसतील, तर त्याचे पैसे 8 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असतील.

त्याचप्रमाणे, 50,000 रुपयांची गुंतवणूक 17 लाख रुपयांची आणि 1 लाख रुपयांची गुंतवणूक 34 लाख रुपये झाली असेल. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी यामध्ये दोन लाख रुपये गुंतवले असतील आणि ती रक्कम होल्ड करून ठेवली असेल तर त्याच्या दोन लाख रुपयांचे 68 लाख रुपये झाले असतील.

ध्रुव कॅपिटल सर्विसेसच्या स्टॉकची 12 महिन्यांची स्थिती

ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेसचे मार्केट कॅप 85 कोटी रुपये आहे. या स्टॉकने गेल्या तीन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला असला तरी देखील अलीकडील शेअरची कामगिरी गुंतवणूकदारांसाठी फायद्याची राहिलेली नाही. याची किंमत गेल्या वर्षभरात 45 टक्के आणि अवघ्या एका आठवड्यात 20 टक्क्यांनी घसरली आहे. डिसेंबर 2024 अखेर प्रवर्तकांकडे कंपनीत 54.18 टक्के हिस्सा होता.

बीएसईवर 21 मार्च 2024 रोजी या समभागाने 52 आठवड्यांचा उच्चांक 485.20 रुपये तयार केला होता. तर 14 फेब्रुवारी 2025 रोजी 204 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक दिसून आला. या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये इतके आहे. कंपनीच्या तिमाही निकालानुसार कंपनीचा नफा हा 68.3% ने कमी झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe