Multibagger Stock : तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करता का? मग तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणी लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असेल. शेअर बाजारातील तज्ञ गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करा असा सल्ला नेहमी देत असतात. पण बाजारात असेही काही स्टॉक आहेत ज्यांनी कमी कालावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिलाय.
आज आपण अशाच एका स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ज्याने 14 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना लखपती बनवली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक 14 महिन्यांपूर्वी बाजारात लिस्ट झाला आणि अवघ्या 14 महिन्यांमध्येच याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत.

आम्ही ज्या स्टॉक बाबत बोलत आहोत तो आहे Trident Techlabs चा स्टॉक. सुमारे 14 महिन्यांपूर्वी बाजारात सूचीबद्ध झालेल्या Trident Techlabs च्या शेअर्सने IPO गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला आहे. फक्त कंपनीचे शेअर्सच नाही तर त्याचा व्यवसाय सुद्धा या काळात झपाट्याने वाढला आहे आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा नफा जवळपास दुप्पट झाला आहे.
यामुळे हा स्टॉक नेहमीचं चर्चेत राहतो. जबरदस्त रिटर्न देणारा हा स्टॉक नेहमीच फोकस मध्ये राहतो. शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर IPO गुंतवणूकदारांना 14 महिन्यांत 3279 टक्के नफा मिळाला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये अवघ्या 14 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली होती त्यांना आता 33 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.
दरम्यान काल हा शेअर NSE SME वर 2.52 टक्क्यांच्या घसरणीसह Rs 1,182.95 वर बंद झालाय. आता आपण या स्टॉकच्या शेअर बाजारातील कामगिरीची आणि ही कंपनी नेमकी काय काम करते याचा आढावा घेणार आहोत.
कशी आहे शेअरची आतापर्यंतची कामगिरी
ट्रायडेंट टेकलॅबचे शेअर्स डिसेंबर 2023 मध्ये IPO गुंतवणूकदारांना ₹ 35 च्या किमतीने जारी करण्यात आले होते आणि 29 नोव्हेंबर 2023 रोजी ते NSE SME वर ₹ 98.15 म्हणजेच 180% पेक्षा जास्त प्रीमियमवर सूचीबद्ध झाले होते आणि दिवसाच्या शेवटी ते ₹ 103.05 वर बंद झाले.
त्यामुळे पहिल्याच दिवशी आयपीओ गुंतवणूकदारांच्या भांडवलात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. यानंतर शेअर्स आणखी वेगाने वाढले. गेल्या वर्षी 16 फेब्रुवारी 2024 रोजी तो ₹175.20 या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.
या निम्न स्तरावरून, 11 महिन्यांत 853.20 टक्क्यांनी झेप घेतली आणि 9 जानेवारी 2025 रोजी ₹ 1,670.00 चा विक्रमी उच्चांक गाठला, म्हणजेच IPO गुंतवणूकदारांच्या पैशात 13 महिन्यांत सुमारे 4671 टक्क्यांनी वाढ झाली, म्हणजेच 47 पटीने. शेअर्सची वाढ इथेच थांबली आणि सध्या ती या उच्चांकावरून 29 टक्के घसरली असली तरी IPO गुंतवणूकदार अजूनही 3280 टक्के नफ्यात आहेत.
ट्रायडेंट टेकलॅब कंपनीबाबत थोडक्यात
ट्रायडेंट टेकलॅब कंपनीबाबत बोलायचं झालं तर ही कंपनी एरोस्पेस, संरक्षण, ऑटोमोटिव्ह, दूरसंचार, वैद्यकीय, सेमीकंडक्टर आणि वीज वितरण उद्योगांना तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा पुरवते. म्हणजेच ही सर्विस इंडस्ट्री मधील कंपनी आहे.
त्याचा व्यवसाय अभियांत्रिकी सोल्यूशन्स आणि पॉवर सिस्टम सोल्यूशन्स या दोन क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी सर्विस इंडस्ट्री मध्ये असली तरी देखील या कंपनीचा व्यवसाय हा झपाट्याने वाढताना दिसतोय.
यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्यांनी पैसे लावलेत त्यांना सुद्धा चांगला फायदा मिळतोय. या कंपनीचा निव्वळ नफा 2024 च्या आर्थिक वर्षात वार्षिक आधारावर ₹ 4.67 कोटी वरून ₹ 9.37 कोटी झाला आहे. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न सुमारे 7 टक्क्यांनी वाढून ₹ 73 कोटी इतके झाले आहे.
9 जानेवारी 2025 पासून या स्टॉकच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. कालही या स्टॉकच्या किमतीत घसरण झाली. परंतु त्याआधी या स्टॉक ने शेअर बाजारात दमदार कामगिरी केलेली आहे. म्हणून या स्टॉक मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळाला आहे.