Multibagger Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजचा हा लेख विशेष कामाचा ठरणार आहे. Multibagger Stock मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी विशेष फायद्याची असेल. कारण की आज आपण अशा एका स्टॉकची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या अकरा वर्षांच्या काळात करोडो रुपयांचे रिटर्न दिले आहेत.
शेअर बाजारातील तज्ञ लोक सांगतात की, योग्य वेळी योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळू शकतो. दरम्यान याचाचं एक उत्तम नमुना म्हणजे टॅनला प्लॅटफॉर्म्स (Tanla Platforms) या कंपनीच्या शेअर्सने दिलेला परतावा. एकेकाळी फक्त ₹3.90 किमतीचा हा पेनी स्टॉक 11 वर्षांत तब्बल 13,340% वाढला असून सध्या ₹524.15 वर पोहोचला आहे.

दीर्घकालीन गुंतवणुकीतुन मोठा नफा
2014 मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य तब्बल 1.34 कोटी झाले असते. मात्र, मागील पाच वर्षांतील परफॉर्मन्स पाहता, ₹1 लाखचे फक्त 6.5 लाख झाले असते. यावरून स्पष्ट होते की, शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते.
शेअरच्या किमतीतील मोठी वाढ आणि घसरण
टॅनला प्लॅटफॉर्म्सच्या शेअरने गेल्या पाच वर्षांत जवळपास 550% वाढ दर्शवली आहे. मात्र, मागील तीन वर्षे आणि विशेषतः गेल्या एका वर्षात शेअरची कामगिरी कमजोर राहिली आहे.
मागील तीन वर्षांत हा शेअर 64% घसरला असून, गेल्या एका वर्षात त्यात 46% घसरण झाली आहे. हा शेअर 15 जुलै 2023 रोजी 1086.05 च्या उच्चांकावर पोहोचला होता, तर 12 फेब्रुवारी 2024 रोजी तो 52 आठवड्यांच्या नीचांक 515.90 वर आला.
टॅनला प्लॅटफॉर्म्स, एक मजबूत CPaaS कंपनी
ही कंपनी CPaaS (Communications Platform as a Service) क्षेत्रात कार्यरत असून, डिजिटल कम्युनिकेशन सेवांमध्ये मोठे योगदान देते. बाजारतज्ज्ञांच्या मते, भविष्यात या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही संधी ठरू शकते.
गुंतवणूक करण्यापूर्वी काय विचार करावा?
शेअर बाजारात कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. टॅनला प्लॅटफॉर्म्सच्या बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळाला असला, तरी सध्याच्या अस्थिरतेचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. यामुळे कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा.