Multibagger Stock : शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. अवघ्या काही वर्षाच्या काळात शेअर बाजारातील कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. हजूर मल्टी प्रोजेक्ट्स कंपनीने देखील गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 29 हजार टक्क्याहून अधिक चे रिटर्न दिले आहेत.
या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्सच्या किंमती गेल्या पाच वर्षात 16 पैशांवरून 48 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. आज 13 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक 3 टक्क्यांहून अधिक वाढीसह 48.40 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 5 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 29000 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
![Multibagger Stock](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Multibagger-Stock-1.jpeg)
हजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे शेअर्स 5 वर्षांत 16 पैशांवरून 48 रुपयांपर्यंत वाढले आहेत. हजूर मल्टी प्रोजेक्ट्सने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी आपले शेअर्स स्प्लिट सुद्धा केले आहेत. दरम्यान आज आपण या कंपनीबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
5 वर्षात गुंतवणूकदारांना किती परतावा मिळाला?
हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षांत 29800 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारी 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 16 पैशांवर होते. मात्र आज 13 फेब्रुवारी 2025 रोजी हजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे शेअर्स 48.40 रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 14000 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत, हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्सच्या किमतीत 1600 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
तसेच गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्च पातळी 63.90 रुपये अन 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 28.41 रुपये इतकी आहे.
कंपनीला मिळाला एक मोठा कॉन्ट्रॅक्ट
हजूर मल्टी प्रोजेक्ट्सला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) कडून एक प्रकल्प सुद्धा मिळाला आहे. वापरकर्ता शुल्क संग्राहक एजन्सी म्हणून काम करण्यासाठी कंपनीला NHAI कडून लेटर ऑफ अवॉर्ड मिळाला आहे. या प्रकल्पाची किंमत 7.91 कोटी रुपये इतकी आहे.