Multibagger Stock : शेअर मार्केट मधील तज्ञ मंडळी गुंतवणूकदारांना नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला देतात. शेअर मार्केटमधील स्टॉक लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा देतांना दिसतायेत. मात्र बाजारात असेही काही स्टॉक आहे ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पकालावधीत चांगला नफा मिळवून दिला आहे.
श्री रामा न्यूजप्रिंट लिमिटेड हा सुद्धा असाच एक स्टॉक आहे. या शेअरने अल्पावधीत महत्त्वाचे म्हणजे सध्या शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असताना गुंतवणूकदारांना लखपती बनवलंय.

स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात या शेअरची किंमत 14.68 रुपयांवरून थेट 34.57 रुपयांवर पोहोचली आहे. अर्थात फक्त तीस दिवसांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 135% रिटर्न दिले आहेत.
या एका महिन्याच्या काळात गुंतवणूकदारांची गुंतवणूक दुप्पटहुन अधिक झाली आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही एक महिन्यापूर्वी या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले असतील तर आज या शेअर्सची किंमत 2.35 लाख इतकी झाली असेल. अर्थात अवघ्या एका महिन्याच्या काळात गुंतवणूकदारांना या शेअर्समधून 1.35 लाख रुपयांचा नफा झाला आहे.
एका आठवड्यात 48% परतावा
महत्त्वाची बाब अशी की, या स्टॉकने फक्त एका आठवड्यातच 48% परतावा दिला आहे. स्टॉक एक्सचेंज वर उपलब्ध माहितीनुसार हा स्टॉक 19 फेब्रुवारी 2025 रोजी 23.22 रुपयांवर होता.
मात्र मंगळवारी 25 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक 34.57 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच, एका आठवड्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 48% रिटर्न दिले आहेत. अर्थात यात जर कोणी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत 1.5 लाख रुपये झाली असती.
स्टॉकची प्रिवीयस क्लोजिंग प्राईस
या स्टॉकची प्रेविअस क्लोजिंग प्राईस 34.57 इतकी आहे. म्हणजे मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी हा शेअर 34.57 बंद झाला. या दिवशी हा स्टॉक 5% नी घसरला. पण गेल्या गेल्या काही आठवड्यांपासून त्याने अनेकदा अप्पर सर्किट गाठले आहे. याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 36.40 रुपये आहे. म्हणजे सध्या हा स्टॉक त्यांच्या उच्चांकाच्या जवळच आहे.