16 रुपयांचा ‘हा’ स्टॉक पोहोचला 2883 रुपयांवर, 1 लाखाचे बनलेत 1.83 कोटी

भारतीय शेअर बाजारात सध्या मंदीचे वातावरण आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. KDDL Ltd कंपनीचा स्टॉक देखील आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा राहिला असून गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना यातून चांगला परतावा मिळाला आहे.

Published on -

Multibagger Stock : शेअर बाजारातील तज्ञ लोक गुंतवणूकदारांना नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळतो. आतापर्यंत शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा दिला आहे.

केडीडीएल लिमिटेडच्या स्टॉकने देखील लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून आज आपण याच स्टॉकची माहिती पाहणार आहोत. खरे तर या कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपले तिमाही निकाल जाहीर केलेत.

कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर या कंपनीच्या स्टॉक मध्ये आता वाढही होऊ लागली आहे. शॉर्ट टर्म मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून लॉन्ग टर्म मध्ये तर या स्टॉकने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल बनवले आहे.
KDDL Ltd शेअरची सध्याची स्थिती

केडीडीएल लिमिटेडच्या स्टॉकने

25 फेब्रुवारी 2025 रोजी केडीडीएल लिमिटेडचा स्टॉक 2883 रुपयांवर क्लोज झाला. खरंतर 25 फेब्रुवारीला हा स्टॉक आठ टक्क्यांनी घसरला. सध्या हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 2883 रुपयांवर आहे. शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी सुद्धा हा स्टॉक फायद्याचा ठरला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरची किंमत 25.18 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

16 वर्षात गुंतवणूकदारांना मिळाला जबरदस्त परतावा

हा स्टॉक गेल्या 16 वर्षांमध्ये 17 हजार 373 टक्क्यांनी वाढला आहे. सोळा वर्षांपूर्वी हा स्टॉक 16.50 रुपयांवर ट्रेड करत होता मात्र आता याची किंमत 2883 रुपये इतकी झाली आहे. अर्थात या काळात या कंपनीचा स्टॉक 175 पट वाढलाय.

अर्थातच 16 वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले होते त्या एक लाख रुपयांच्या शेअरची किंमत सध्या 1.83 कोटी रुपये इतकी झाली आहे.

अर्थातच लॉंग टर्म मध्ये या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला असून लाखभर रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपयांची झाली आहे. अर्थातच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना दीड दशकाच्या काळातच कोट्याधीश बनवले आहे.

तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये देखील या स्टॉकची कामगिरी फारच उत्कृष्ट राहिली आहे. पाच वर्षात या कंपनीचे स्टॉक 1016 टक्क्यांनी वाढले आहेत. YTD आधारावर मात्र या स्टॉक मध्ये सात टक्क्यांची घसरण झालेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe