Multibagger Stock : भारतीय शेअर मार्केट मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चढ उतार सुरू आहेत. खरे तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मधून चांगला परतावा मिळतो. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा दिला आहे.
मार्केटमध्ये असे अनेक Multibagger Stock आहेत ज्यातून गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. दरम्यान आज आपण अशाच एका स्टॉकची माहिती पाहणार आहोत ज्याने गुंतवणूकदाराच्या एका लाखाचे 2.56 कोटी रुपये बनवले आहेत. हा स्टॉक 4.60 रुपयांवरून थेट 1100 रुपयांवर पोहोचला आहे.

आम्ही ज्या मल्टीबॅगर स्टॉकबाबत बोलत आहोत तो आहे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. चा स्टॉक. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी शेअर सध्या 1,182.85 रुपयांवर ट्रेड करत आहे, पण, गेल्या 5 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 7,864.86 % इतके जबरदस्त रिटर्न दिले आहेत.
म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी यात 1 लाख इन्व्हेस्ट केले असतील आणि ती रक्कम आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर त्याचे मूल्य 2.56 कोटी रुपये इतके झाले असेल. म्हणजे या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांमध्ये चक्क करोडपती बनवले आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती परतावा मिळाला
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 62,673.92 कोटी इतके आहे. आज त्याचे शेअर्स प्रति शेअर 1,219 च्या इन्ट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. या स्टॉकने गेल्या एका वर्षात 107 टक्क्यांनी आणि गेल्या तीन वर्षात 808 टक्क्यांनी परतावा दिला आहे.
तसेच पाच वर्षांच्या काळात हा स्टॉक 4.60 रुपयांवरून ते 1100 रुपयांवर पोहोचला आहे म्हणजेच या कालावधीत या स्टॉकने 7864.86% इतका जबरदस्त परतावा दिला आहे.
पण या स्टॉकची अलीकडील कामगिरी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. हा स्टॉक अल्पावधीत घसरला आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 15.36 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या स्टॉकच्या किमतीमध्ये 58.34 टक्के वाढ झाली आहे.