Multibagger Stock : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा मिळतो. म्हणून बाजारातील तज्ञ शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना नेहमीचं दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.
शेअर मार्केट मधील अनेक स्टॉकने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील या कचऱ्याचा गुंतवणूकदारांना सुद्धा मोठा फटका बसला आहे.

पण अशा या सिच्युएशनमध्ये देखील काही शेअर्सने लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा दिला आहे. दरम्यान, आज आपण अशाच एका स्टॉकची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने लॉन्ग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 17,757% रिटर्न दिले आहेत.
न्यूलैंड लेबोरेटरीज कंपनीचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 18,000 टाक्यांपर्यंतचे रिटर्न दिले असल्याने आज आपण याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
न्यूलैंड लेबोरेटरीज स्टॉकची शेअर बाजारातील स्थिती
न्यूलैंड लेबोरेटरीज कंपनीचा स्टॉक सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 11,000 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र 13 वर्षांपूर्वी हा स्टॉक फक्त 61 रुपयांवर होता. म्हणजेच तेरा वर्षांच्या काळात या स्टॉकने 17757% रिटर्न दिले आहेत.
1 लाखाचे बनलेत 1.87 कोटी
न्यूलैंड लेबोरेटरीजने तेरा वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 17,757% रिटर्न दिले असून ज्या गुंतवणूकदारांनी तेरा वर्षांपूर्वी या कंपनीचे 1 लाख रुपयांचे स्टॉक खरेदी केले असतील त्या स्टॉक चे आजचे किंमत एक कोटी 87 लाख इतकी झाली असेल.
स्टॉकने किती परतावा दिलाय?
गुरुवारी, 27 फेब्रुवारी 2025 रोजी, NSE वर न्यूलँड लॅबोरेटरीजचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरलेत, अन हा हा स्टॉक आज 10,915 वर व्यवहार करत आहे. मात्र न्यूलँड लॅबोरेटरीज स्टॉक गेल्या वर्षभरात अस्थिर आहे. गेल्या सहा महिन्यांत न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअर्सची किंमत 11 टक्क्यांनी आणि गेल्या एका महिन्यात 19.13 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.
वर्षभराच्या म्हणजे YTD आधारावर, Newland Laboratories च्या शेअरची किंमत 14,294 वरून 10,915 प्रति शेअर इतकी कमी झाली आहे. अर्थातच यात 23.64 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.