Mumbai Agra Highway : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील एक महत्त्वाचा नॅशनल हायवे प्रकल्प असून याच महत्वकांक्षी महामार्ग प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. खरेतर, अलीकडील काही वर्षांमध्ये मुंबई आग्रा हायवेने प्रवास करणे फारच आव्हानात्मक बनले आहे. अनेक ठिकाणी या महामार्गाची दुरावस्था झाली आहे.
पिंपळगावच्या पुढे तर या महामार्गाची फारच दुरावस्था झाली होती आणि यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील अधिक तीव्र होत होती. म्हणून या भागातील रस्ता हा काँग्रेसचा झाला पाहिजे अशी मागणी केली जात होती.

हिच परिस्थिती विचारात घेता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव ते गोंदेदरम्यानच्या 60 किलोमीटरच्या पट्ट्यावर काँक्रीट टॉपिंगचे काम हाती घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे याचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे.
काही महत्त्वाच्या चौकांवरील काम वगळता हा संपूर्ण रस्ता आता काँक्रीटने तयार करण्यात आला आहे.नाशिक शहरातील अडगाव व ट्रॅक्टर हाऊस चौकांवरील कामही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जून 2024 मध्ये या महामार्गावर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आणि आता मार्च 2025 एंडिंग पर्यंत या प्रकल्पाचे बहुतांशी काम हे पूर्ण झाले आहेत. म्हणजे अवघ्या काही महिन्यांच्या काळात 60 किलोमीटर लांबीच्या अंतरावरील काम जलद गतीने पूर्ण करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यश आले आहे.
खरंतर दरवर्षी हा महामार्ग पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात खराब होतो. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडू नयेत आणि महामार्ग मजबूत व्हावा याचसाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला. हा पद्धतशीर सुधारणा प्रकल्प “व्हाइट टॉपिंग” म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये विद्यमान डांबरी रस्त्यावर एक मजबूत काँक्रीटचा थर दिला जातो.
या प्रकल्पामुळे रस्ता अधिक मजबूत होईल आणि वाहनचालकांना उत्तम प्रवासाचा अनुभव मिळेल. विशेषतः पावसाळ्यात खड्डे निर्माण होण्याची शक्यता संपुष्टात येणार असून वारंवार दुरुस्तीच्या खर्चातही बचत होईल, असे NHAI नाशिकचे तांत्रिक व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी सांगितले.
या 60 किलोमीटरच्या भागातील उड्डाणपूल, वाहन व पादचारी अंडरपास यांच्यावर मात्र व्हाइट टॉपिंग करण्यात आलेले नाही. मात्र, या ठिकाणी नवीन डांबरीकरण करण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल.
पावसाळ्यात महामार्गावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते तसेच वाहनांचेही नुकसान होते. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. व्हाइट टॉपिंगमुळे हे अपघात टाळले जातील आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा बदल सुरक्षित ठरणार आहे, कारण पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर घसरण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. त्यामुळे मुंबई ते आग्रा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. जर तुम्हीही मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी नक्कीच तुझ्यासाठी दिलासादायक ठरणार आहे.