Mumbai Ahmedabad Bullet Train Project : भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. कोळशावर धावणारी रेल्वे आता विजेवर धावू लागले आहे आणि येत्या काही दिवसांनी ती हायड्रोजनवर देखील धावणार आहे. सोबतच हायपरलुप ट्रेन सारखा वेगवान प्रकल्प देखील येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे सध्या देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेस मुळे वेगवान झाला आहे आणि आगामी काळात बुलेट ट्रेन मुळे वेगवान होणार आहे. दरम्यान याच बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे.

खरे तर देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प हा अहमदाबाद ते मुंबई यादरम्यान विकसित केला जाणार असून आगामी काळात देशातील इतरही शहरांना बुलेट ट्रेनची भेट मिळणार आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या माध्यमातून बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोमाने सुरु आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यानही बुलेट ट्रेन धावणार आहे. या दोन्ही शहरादरम्यान बुलेट ट्रेन प्रस्तावित असुन या उच्च-गती रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.
या प्रकल्पामध्ये बिहारमधील बक्सर, आरा, पटणा, गया, धनबाद, आसनसोल, दुर्गापूर आणि बर्दवान अशा महत्त्वाच्या शहरांचा समावेश असून, एकूण 760 किलोमीटरचा हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार असल्याचे प्रस्तावित तपशीलांमध्ये नमूद आहे.
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील सुमारे 260 किलोमीटरचा मार्ग उन्नत ट्रॅकवरून जाईल. हा प्रकल्प सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) टप्प्यात असून, मार्ग निश्चिती व जमीन मोजणीसंबंधी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाराणसी व हावडा यामधील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार अशी माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 किलोमीटर इतका असणार आहे.
काही अहवालानुसार हा प्रवास थोड्या अधिक वेळात – म्हणजे तीन ते चार तासांदरम्यान – पूर्ण होईल, तर काही अहवालांमध्ये हा वेळ केवळ दोन तास इतकाच असेल असे सांगण्यात आले आहे.
उन्नत मार्गावर बक्सर, पटणा, गया, धनबाद, आसनसोल, दुर्गापूर आणि हावडा येथे स्थानके असणार आहेत. याशिवाय आरा आणि नवादा येथील स्थानकांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत या प्रकल्पासाठी बिहारमधील मार्गावरील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वेच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.