महाराष्ट्राला मिळणार 2 सेमी हायस्पीड Railway ! मुंबई आणि पुण्याहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर

ज्या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे तेथील प्रवाशांकडून या गाड्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. दरम्यान आता महाराष्ट्राला दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी विदर्भनगरी नागपूरला या दोन्ही गाड्या मिळणार आहेत. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असे चित्र आता दिसत आहे.

Published on -

Mumbai And Pune Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्रात सध्या स्थितीला अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. ज्या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे तेथील प्रवाशांकडून या गाड्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.

वंदे भारत ट्रेन बाबत बोलायचं झालं तर ही गाडी सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर धावत असून या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास या गाडीमुळे सुपरफास्ट झाला आहे. दरम्यान आता महाराष्ट्राला दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या मार्गांवर सुरू होणार वंदे भारत स्लीपर

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी विदर्भनगरी नागपूरला या दोन्ही गाड्या मिळणार आहेत. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असे चित्र आता दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर रेल्वे विभागाने नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करावी याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वे बोर्डाने सकारात्मक असे संकेत दिलेले आहेत. यामुळे आगामी काळात या दोन्ही गाड्या धावताना आपल्याला दिसतील आणि यामुळे मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर हा प्रवास अधिक आरामदायी आणि सुपरफास्ट होणार आहे.

प्रवाशांचा किती वेळ वाचणार?

नागपूर ते पुणे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांची संख्या फारच मोठी आहे मात्र या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी आहे. शिवाय सध्या ज्या गाड्या धावत आहेत त्यांना अधिकचा वेळ लागतोय. सध्या नागपूर ते पुणे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना 10 तास लागतात.

मात्र वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होणार आहे म्हणजेच प्रवाशांचे सात तास वाचतील. दुसरीकडे मुंबई ते नागपूर असा प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना जवळपास 13-16 तासांचा वेळ खर्च करावा लागतोय. मात्र वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर हा कालावधी दहा तासांवर येणार आहे अर्थातच प्रवाशांचे तीन ते सहा तास वाचणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe