मुंबई-पुणे-बेंगळुरू दरम्यानचा प्रवास होणार वेगवान ! सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 23 Railway Station थांबा घेणार!

मुंबई-बेंगळुरूदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई-बेंगळुरूदरम्यान उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी या मार्गावरील 23 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. लोणावळा पुणे सातारा कराड सांगली अशा महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.

Published on -

Mumbai Bangalore Special Train : मार्च महिना येत्या दोन दिवसात संपणार आहे. थोड्याच दिवसात देशात आता उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील आणि याच अनुषंगाने रेल्वेच्या माध्यमातून विविध रेल्वे मार्गांवर नवीन स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत.

खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते आणि यंदा देखील उन्हाळी हंगामात प्रवाशांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेकजण पिकनिक चा प्लॅन बनवत असतात.

दरम्यान उन्हाळी पर्यटनाच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून दक्षिण पश्चिम रेल्वेने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-बेंगळुरूदरम्यान विशेष उन्हाळी एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष गाड्या बेळगाव, हुबळीमार्गे धावणार असून, प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक

ही विशेष रेल्वे सेवा एप्रिल ते जून या कालावधीत सुरू राहणार आहे. या काळात या विशेष गाडीच्या एकूण 13 फेऱ्या होणार आहेत. रेल्वे मधील अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, सीएसएमटी मुंबईहून प्रत्येक शनिवारी मध्यरात्री बारा वाजून 30 मिनिटांनी ही गाडी सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून 55 एसएमव्हीटी बेंगळुरू स्थानकावर पोहोचणार आहे.

तसेच, परतीच्या मार्गावर, बेंगळुरूहून ही गाडी प्रत्येक रविवारी पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे सोमवारी पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी मुंबईत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

स्पेशल ट्रेन कोण-कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार

मुंबई-बेंगळुरूदरम्यान चालवली जाणारी विशेष उन्हाळी एक्स्प्रेस या मार्गावरील 23 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहेत. ही गाडी या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा,

पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, रायबाग, घाटप्रभा, बेळगाव, लोणडा, धारवाड, एसएसएस हुबळी, एसएमएम हावेरी, राणीबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, बिरूर, अर्सिकेरे आणि तुमकूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe