मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ भागात तयार होणार 8000 कोटी रुपयांचा नवीन मार्ग ! कसा असणार रूट ?

नवी मुंबई येथील विमानतळ येत्या काही महिन्यांनी सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्यात नवी मुंबई येथील विमानतळावरून विमानांची येजा सुरू होईल. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता सिडकोने ठाणे ते नवी मुंबई विमानतळादरम्यान नवीन मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी 8000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Published on -

Mumbai Expressway News : मुंबई नवी मुंबई ठाणे शहरासह परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे नवी मुंबई शहराला लवकरच एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची भेट मिळणार आहे. येत्या जून महिन्यात नवी मुंबई येथे विकसित होणारे विमानतळ प्रवाशांसाठी खुले होणार असल्याचे बातमी मीडिया रिपोर्ट मधून पुढे आली आहे.

दुसरीकडे नवी मुंबई विमानतळाला थेट कनेक्टिव्हिटी मिळावी या पार्श्वभूमीवर सिडको ने देखील कंबर कसली असून सिडकोच्या माध्यमातून शहरात एक नवा मार्ग तयार केला जाणार आहे. 8000 कोटी रुपयांचा हा नवा मार्ग तयार केला जाणार असून यामुळे नवी मुंबई विमानतळावर पोहोचणे सोयीचे होणार आहे.

खरंतर मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला जाण्यासाठी अटल सेतूचा मोठा फायदा होणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई या नव्या विमानतळा सोबत जोडले जाणार आहे. तर दुसरीकडे आता ठाणे देखील या नव्या विमानतळाला जोडले जाणार असून यासाठी एक 26 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब अशी की या मार्गाचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून आता सल्लागाराचा शोध घेणे सुरू झाले आहे. सध्या ठाणे शहरावरून नवी मुंबई विमानतळाकडे जायचे असेल तर प्रवाशांसाठी ठाणे बेलापूर आणि पाम बीच मार्ग उपलब्ध आहेत.

मात्र या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर ही वाहतूक कोंडी आणखी वाढणार आहे. हेच कारण आहे की आता ठाणे ते नवी मुंबई विमानतळापर्यंत नवा मार्ग विकसित होणार आहे.

मात्र हा प्रकल्प पूर्ण करताना सिडकोला मोठ्या आव्हानांचा सामना सुद्धा करावा लागणार आहे. या प्रकल्पात खारफुटीचा अडथळा येऊ शकतो. यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणाची मंजुरी मिळवताना सिडकोला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. खरेतर, ठाण्याच्या वेशीवरील पटनी चौक ते वाशीपर्यंत खारफुटीचा फारसा अडथळा नसला नाहीये.

पण वाशी ते विमानतळापर्यंतच्या डबल डेकर रस्त्याच्या मार्गात अनेक ठिकाणी खारफुटी आणि सीआरझेड क्षेत्र बाधित होणार आहे. आता साहजिकच त्याच्या परवानग्यांचा अडथळा सिडकोला पार करावा लागणार आहे. सिडकोने प्रस्तावित केलेल्या या उन्नत मार्गबाबत बोलायचं झालं तर हा मार्ग 26 किमीचा आहे.

याची सुरुवात दिघ्यातील पटणी चौकापासून होईल अन त्याचा पहिला टप्पा वाशीपर्यंत राहील. या पहिल्या टप्प्याची लांबी 17 किलोमीटर एवढी राहणार असून पहिला टप्पा ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर असेल. पुढे वाशी ते नवीन विमानतळापर्यंतचा 9 कि.मी.चा मार्ग हा उन्नत राहील पण हा मार्ग उन्नत असला तरी देखील येथे दुमजली उड्डाणपूल बांधला जाणार आहे.

दरम्यान पटणी चौक ते वाशी या 17 किलोमीटर लांबीच्या आणि वाशी ते नवीन विमानतळापर्यंतच्या नऊ किलोमीटरच्या लांबीच्या मार्गासाठी सिडको जवळपास आठ हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. यामुळे नक्कीच ठाणे ते नवी मुंबई येथील विमानतळ दरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून ठाणेकरांना या मार्गाचा फायदा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe