Mumbai Goa Highway : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईहून गोव्याकडे प्रवास करतात. परंतु या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास हा फारच आव्हानात्मक बनलाय.
मुंबईकरांना कोकणात आणि गोव्यात जाण्यासाठी वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. सध्या मुंबईहून कोकणात किंवा गोव्याला जायचे असेल तर मुंबई गोवा महामार्ग हा एकमेव पर्याय प्रवाशांच्या पुढे असतो.

मात्र आता मुंबई ते गोवा यादरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे कारण की केंद्रातील सरकारने नुकत्याच एका महत्त्वाकांक्षी रस्ते विकासाच्या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय कॅबिनेटच्या आर्थिक व्यवहार समितीने काल, 19 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातील जेएनपीए पोर्ट (पागोटे) ते चोक या 29.219 किमी लांबीच्या सहा-लेन प्रवेश नियंत्रित राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीला मंजुरी दिली आहे.
यासाठी केंद्र सरकारकडून 4500 कोटी रुपयांच्या खर्चात सुद्धा मान्यता देण्यात आली असून यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला वेळ येणार आहे. हा रस्ता फक्त 29 किलोमीटर लांबीचा असला तरी देखील यामुळे मुंबई ते गोवा दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.
कारण की या रस्त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या जेएनपीटीवर पोहोचण्यासाठी ट्राफिकमुळे 2 ते 3 तास लागतात.
मात्र हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या दूर होईल आणि हा प्रवास अवघ्या काही मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होईल. जेएनपीटीला जोडल्या जाणाऱ्या या मार्गाची सुरुवात पागोटे या गावापासून होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाने काल 19 मार्च रोजी मंजुरी दिलेला हा महामार्ग सध्या अस्तित्वात असणाऱ्या अनेक महत्त्वपूर्व महामार्गांना जोडला जाणार आहे. उरण-चिरनेर हायवे, मुंबई-गोवा हायवे आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे यांना हा महामार्ग जोडण्यात येणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
तसेच, भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडोर, मुरबाड-जुन्नर हायवे, समृद्धी एक्स्प्रेसवे आणि नाशिक हायवेला सुद्धा जोडण्यात येईल. वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेवेला देखील हा नवा रस्ता जोडला जाईल.
म्हणजे या छोट्याशा रस्ते विकासाच्या प्रकल्पामुळे JNPT, गोवा, पुणे आणि मुंबईतील प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर हा नवीन महामार्ग अटल सेतूच्या शिवडीच्या टोकापासून ते कोस्टल रोड आणि वरळीच्या सीलिंकला जोडण्यात येणार आहे.
भविष्यात हा रस्ता अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी एक्सप्रेसवे आणि पडघा जवळील नाशिक महामार्गाशी (मोरबे, कर्जत, शेलू, वाघानी आणि बदलापूर मार्गे) जोडला जाईल अन साहजिकच या महामार्ग प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.