मुंबई ते गोवा प्रवास होणार वेगवान ! दोन्ही शहरांमधील प्रवास 6 तासांवर येणार, ‘हा’ महामार्ग लवकरच खुला होणार

मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लवकरच मुंबईहून कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्यांचा प्रवास वेगवान होणार आहे. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच याबाबत माहिती दिली आहे.

Published on -

Mumbai – Goa Highway : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होईल असे चित्र तयार होत आहे. खरे तर, सध्या स्थितीला दोन दशकांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास हा फारच आव्हानात्मक बनला आहे.

मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करतांना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा प्रवास नकोसा होतो. पण आता हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा बहूचर्चीत मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सर्वसामान्यांसाठी पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नॅशनल हायवेचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः या महामार्ग प्रकल्पाच्या बाबत ही माहिती दिली आहे.

नक्कीच जून महिन्यात या महामार्गाचे काम सुरू झाले तर मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होणार आहे. या महामार्गाच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा हा फक्त आणि फक्त सहा तासात पूर्ण होणार आहे.

खरेतर, सध्या मुंबई ते गोवा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना जवळपास दहा ते बारा तासांचा वेळ लागतोय. म्हणजेच मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले की प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे.

खरेतर, या प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पाची अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असे सांगितले की, जमीन अधिग्रहण, कायदेशीर अडथळे आणि विभागांमधील समन्वयाचा अभाव यामुळे या प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते.

मात्र, आता या महामार्ग प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून या रस्त्याचे काम अगदीच वेगाने सुरू आहे. यामुळे आता लवकरच महत्वाचा महामार्ग प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

यावेळी त्यांनी या रस्ते विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थास चालना मिळेल, हा महामार्ग कोकणाच्या एकात्मिक विकासासाठी मोलाची भूमिका बजावेल, असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या महामार्गासोबतच सरकार नवीन टोल प्रणाली लागू करत आहे. यामध्ये वाहनांना थांबावे लागणार नाही, तर सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवासाच्या अंतरावरून ऍटोमॅटिक टोल आकारला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे टोलची रक्कम वाहन मालकाच्या खात्यातून थेट वसूल केली जाणार आहे.

यामुळे वाहन चालकांना विना थांबा वेगवान प्रवास करता येणार आहे. विशेष बाब अशी की, ही प्रणाली पुढील दोन आठवड्यांत सुरू होण्याची शक्यता असून, प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News