Mumbai Goa Railway : मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे रेल्वेच्या माध्यमातून लवकरच नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या ट्रेनमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
खरे तर येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि याच उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने भारतीय रेल्वेने मुंबई आणि तिरुअनंतपुरम (कोचुवेली) दरम्यान एक विशेष समर स्पेशल ट्रेन जाहीर केली आहे.

ही ट्रेन गोव्या मार्गे धावणार असल्याने मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. ही गाडी गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून समोर येत आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार समर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि तिरुअनंतपुरम (कोचुवेली) दरम्यान चालवले जाणारे विशेष एक्सप्रेस ट्रेन ( ट्रेन No. 01063) 3 एप्रिल ते 29 मे या कालावधीत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सोडली जाणार आहे.
या काळात ही गाडी दर गुरुवारी दुपारी 4 वाजता एलटीटीहून सोडले जाणार आहे आणि शुक्रवारी रात्री 10:45 वाजता कोचुवेलीला पोहोचेल.
तसेच कोचुवेली ते एलटीटी (ट्रेन क्रमांक 01064) स्पेशल ट्रेन 5 एप्रिल ते 31 मे या कालावधीत कोचुवेली येथील सोडली जाणार आहे.
या काळात ही गाडी कोचुवेली येथून शनिवारी संध्याकाळी 4:20 वाजता सोडली जाईल आणि सोमवारी सकाळी 12:45 वाजता एलटीटी येथे पोहचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार स्पेशल ट्रेन?
ठाणे, पनवेल, पेन, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी मडगाव, कारवार, गोकरना रोड, कुम्ता, मुरुदेश्वर मार्गे पुढे रवाना होणार आहे. या मार्गावरील जवळपास सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.