Mumbai-Goa Travel : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि रस्ते विकासाच्या याच प्रकल्पांमुळे सध्या भारतातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच मजबूत झाली आहे. राज्यात सुरू असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम देखील येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे.
समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटरचा भाग सध्या स्थितीला वाहतुकीसाठी सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या महामार्गाचा 76 किलोमीटर लांबीचा उर्वरित भागही लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.

यामुळे या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले आहे. पण मुंबई गोवा महामार्ग हा असा एक महामार्ग प्रकल्प आहे जो गेल्या पंधरा वर्षांपासून रखडला आहे. यामुळे मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय.
सध्या मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करायचे म्हटले की रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गानेच प्रवास करता येतो. रस्ते मार्गाने म्हणजेच मुंबई ते गोवा महामार्गाने प्रवास करायचे झाले असे प्रवाशांना जवळपास 14 ते 15 तासांचा कालावधी खर्च करावा लागतो.
जर समजा रेल्वेने प्रवास करायचं म्हटलं तर प्रवाशांना 9 तासांपर्यंतचा काळ लागतो. मात्र आगामी काळात मुंबई ते गोवा हा प्रवास फक्त सहा तासात पूर्ण होणार आहे. कारण की आता मुंबई ते गोवा दरम्यान समुद्र मार्गाने प्रवास करता येणार आहे.
मुंबई ते गोवा हे 589 किलोमीटरचे अंतर समुद्र मार्गाने अवघ्या सहा तासात पार करता येणार असून यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास निश्चितच आरामदायी होणार आहे. जलवाहतूक सेवा देणारी एक खाजगी कंपनी मुंबई ते गोवा दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
अर्थात खाजगी कंपनीच्या प्रवासी जहाजाच्या माध्यमातून मुंबई ते गोवा यादरम्यान सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. मुंबई येथील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान ही रो रो फेरी चालवली जाणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे.
पहिल्यांदा ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असून या प्रवासी जहाजात एकूण 60 प्रवासी बसू शकतात अशी माहिती हाती आली आहे. या वाहतुकीच्या नव्या पर्यायामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होणार आहे यात शंकाच नाही शिवाय महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमधील पर्यटनाला देखील या नव्या पर्यायामुळे चालना मिळणार आहे.
मुंबईहून असंख्य पर्यटक गोव्याला जात असतात आणि गोव्यातील मंडळी देखील मुंबईला कामानिमित्ताने जात असते. अशा परिस्थितीत या रो-रो फेरीचा गोवेकरांना आणि मुंबईकरांना सारखाच फायदा होणार आहे.