Mumbai Goa Vande Bharat Express : फेब्रुवारीत राज्याला दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होऊन या दोन वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यात. सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते साईनगर शिर्डी या मार्गावर या ट्रेन सुरू करण्यात आल्या.
त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणातील आमदारांना मुंबई ते गोवा या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा आश्वासन दिल.
या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतर लगेचच या मार्गावर ट्रेन चालवली जाईल असं त्यांनी त्यावेळी नमूद केलं होतं. दरम्यान, त्या आश्वासनाची पूर्ती आता होणार आहे. कारण की मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! पावरग्रीड कॉर्पोरेशन मध्ये ‘या’ पदाची भरती सुरू, आजच करा अर्ज
केवळ 7 तासात पूर्ण करणार मुंबई-गोवा अंतर
आम्ही आपणास सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वी झाली आहे. चाचणी दरम्यान वंदे भारत ट्रेन सीएसएमटी वरून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटली आणि मडगाव रेल्वे स्थानकावर बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचली.
अर्थातच चाचणी दरम्यान वंदे भारत ट्रेन ने सात तासात मुंबई ते गोव्याचा प्रवास केला. सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांना हाच प्रवास करण्यासाठी जवळपास दहा तासांचा कालावधी लागतो. निश्चितच या एक्सप्रेस गाड्यांना थांबा अधिक असल्याने कालावधी जास्त लागत आहे मात्र वंदे भारत एक्सप्रेसला काही ठराविक थांबे राहतील आणि यामुळे ही गाडी लवकरच हा प्रवास पूर्ण करणार आहे.
केव्हा सुरु होणार ट्रेन
हे पण वाचा :- म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4 हजार 83 घरांसाठी सोमवारी निघणार जाहिरात; कोणत्या भागातील घरांचा राहणार समावेश? किंमत किती, पहा….
सीएसएमटी ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता प्रवाशांच्या माध्यमातून ही गाडी केव्हा सुरू होते याबाबत विचारणा देखील सुरू झाली आहे. दरम्यान भारतीय रेल्वे बोर्डाने याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.
परंतु एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत ट्रेन 29 मे 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे सुरु केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 29 मे ला पंतप्रधान मोदी मडगाव येथील रेल्वे स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणेचा टप्पा झाला पूर्ण ! दोन पूल, दोन बोगदे अन एक इंटरचेंज; काय आहेत या मार्गाच्या विशेषता?
निश्चितच या ट्रेनमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास सुलभ होणार आहे. या ट्रेनचा कोकणातील प्रवाशांना देखील फायदा होणार आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राज्य राजधानी तसेच एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
तसेच गोवा हे देखील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. गोव्याला मुंबईहून मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. अशा परिस्थितीत, या मार्गावर सुरू होणारी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास हा सुसाट होणार आहे.
हे पण वाचा :- अमेरिकन व्यक्तीच भारतीय शेतकऱ्यांसाठी भन्नाट संशोधन; तयार केला मायक्रो सोलर पंप, कसा होतोय शेतकऱ्यांचा फायदा? पहा…