मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….

मुंबई ते गोवा दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी खास राहणार आहे.

Published on -

Mumbai – Goa Vande Bharat : ऑगस्ट महिना हा सणासुदीचा राहणार आहे. नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होईल आणि त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान आगामी गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

रेल्वे प्रशासन गणरायाच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. खरंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असते.

यामुळे रेल्वे कडून गणपती मध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे तसेच कोकण रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणाही केली आहे.

तर दुसरीकडे आता कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात तसेच तेजस एक्सप्रेसच्या संदर्भात रेल्वे कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. 

काय आहे रेल्वेचा निर्णय ? 

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसची प्रवासी संख्या वाढते. गणेशोत्सवात देखील वंदे भारत एक्सप्रेसने अनेकजण गावी जाणार आहे.

दरम्यान मुंबई -गोवा मार्गावर चालवण्यात येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गणेशोत्सवाच्या काळात उकडीचे मोदक वाटण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे.

आय आर सी टी सी च्या वतीने गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत या दोन्ही गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उकडीचे मोदक वाटण्यात येणार आहेत.

27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरु होत आहे आणि गणपती बाप्पा हे संबंध महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे. त्यामुळं गणपतीला लाखो चाकरमानी गावाकडे जातात अन मोठ्या जल्लोषात गणरायाचे स्वागत करतात. 

कस आहे मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक?

सध्या कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू आहे यानुसार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत (ट्रेन क्रमांक 22229) ही गाडी आठवड्यातीलच तीन दिवस म्हणजेच सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी चालवली जाते.

हे तीन दिवस मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी सकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी सोडली जाते आणि दुपारी साडेतीन वाजता ही गाडी गोव्यातील मडगावला पोहोचते.

तसेच परतीच्या प्रवासात मडगाव सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस म्हणजेच गाडी क्रमांक 22230 आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस चालवली जाते.

या दिवशी ही गाडी दुपारी 12:20 वाजता मडगाव रेल्वे स्थानकावरून सोडले जाते आणि रात्री 10:25 वाजता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!