Mumbai High Court Job News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी अर्थातच मुंबई. मुंबईला स्वप्ननगरी मायानगरी आणि बॉलीवुड नगरी म्हणून ओळखले जाते.
या स्वप्ननगरीत असंख्य स्वप्न उराशी बाळगून कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त दररोज हजारो नागरिक येत असतात. दरम्यान जर तुमचेही राजधानी मुंबईत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी स्वप्ननगरी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मुंबई हायकोर्टात विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
या भरतीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुकांनी ताबडतोब अर्ज करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण मुंबई हायकोर्टात सुरू असणाऱ्या या विविध रिक्त पदांच्या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयात रिसोर्स पर्सोनल म्हणजेच संसाधन कर्मचारी या रिक्त पदाच्या जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
किती जागांसाठी होणार भरती?
मुंबई हायकोर्टाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदभरती अंतर्गत 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या पदभरतीसाठी कोण अर्ज करू शकतो
मिळालेल्या माहितीनुसार या पदभरतीसाठी मुंबई हायकोर्टातून निवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.
नोकरीं कुठे करावी लागणार?
या पदभरती अंतर्गत ज्या उमेदवारांची नियुक्ती होईल त्यांना राजधानी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये नोकरी करावी लागणार आहे.
पगार किती मिळणार?
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३१,०६४ रुपये मानधन दिले जाणार असल्याची माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
अर्ज कसा करायचा
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. उमेदवारांनी रजिस्टार (पर्सनल), हाय कोर्ट, एॅपलट साइड, मुंबई, पाचवा मजला, नवीन मंत्रालय बिल्डिंग, जी. टी. हॉस्पिटल कंपाउंट, क्रॉफर्ड मार्केटजवळ, एल.टी. मार्ग, मुंबई येथे अर्ज पाठवायचा आहे.