Mumbai Mahanagarpalika Jobs : मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना मुंबई महापालिकेत नोकरी करायचे असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची पर्वणी राहणार आहे.
कारण की मुंबई महापालिकेत नुकतीच एक भरती काढण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून महापालिकेतील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण या पदभरती बाबत आवश्यक ती माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा मुंबईत; ठाणे ते पश्चिम उपनगरातील ‘या’ शहराच अंतर फक्त 15 मिनिटात होणार पार, पहा….
कोणत्या पदासाठी होणार भरती?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेत कम्युनिटी मेडिसिन विभागातील सहाय्यक प्राध्यापक, प्लास्टिक सर्जरी विभागातील सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती जागांसाठी होणार भरती?
या पदभरतीच्या माध्यमातून दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक अहर्ता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य आहे. म्हणजे उमेदवाराने संबंधित विषयातील M.D. पदवी किंवा D.N.B किंवा M.S. पर्यंतचे शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. दरम्यान शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी एकदा अधिसूचना वाचणे गरजेचे आहे.
किती मिळणार पगार?
वर नमूद केलेल्या दोन्ही पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना एक लाख रुपये प्रति महिना इतक मानधन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अधिष्ठाता, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई- 400022 या पत्त्यावर उमेदवाराला आपला अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक?
या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवार चार मे 2023 आणि 9 मे 2023 पर्यंत आपला अर्ज सादर करू शकणार आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी लागणार आहे.
हे पण वाचा :- पुणे-नासिक हायस्पीड रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची परवानगी केव्हा मिळणार, प्रकल्पाची सद्यस्थिती काय? पहा….