Mumbai Metro News : मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. सध्या मुंबई शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. मेट्रो लाईन 2B-चा मंडाळे आणि डायमंड गार्डन दरम्यानचा 5.6 किमीचा पट्टा लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने दोन दिवसांपूर्वी या मार्गांवर इलेक्ट्रिक पॉवरचा सप्लाय पुरवण्यास सुरवात केली आहे.
याचा अर्थ या मार्गांवर ओव्हरहेड इक्विपमेंटला इलेक्ट्रिक पॉवर पुरवण्यात आली आहे. मेट्रो ट्रॅकच्या वरच्या तारांची प्रणाली जी ट्रेनला वीज पुरवते याला आता इलेक्ट्रिक पॉवर भेटली आहे. हे असे सूचित करते की या सेगमेंटमध्ये म्हणजे 23.6km च्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे उद्घाटन लवकरच शक्य आहे.

मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA ने मंडाळे डेपोच्या चाचणी ट्रॅकवर ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्सचे एनर्जीझेशन पूर्ण केले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इथे पहिली ट्रेन आणली गेली आहे. यामुळे आता मुंबईकरांना लवकरच एक नवा मार्ग मिळणार आहे.
MMRDA मधील एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, या मार्गांवरील ट्रायल रन सुरू करण्यासाठी आणि पूर्ण ऑपरेशन्सची तयारी करण्यासाठी ही बाब फारच महत्त्वाची आहे. या कामामुळे या प्रकल्पचा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. या सर्व डेव्हलपमेंट पाहता वर्षाच्या अखेरीस मंडाळे ते डायमंड गार्डन विभागात मेट्रो कार्यान्वित होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
कसा असणार मेट्रो मार्ग ?
मेट्रो लाईन 2B बाबत बोलायचं झालं तर हा टप्पा पश्चिमेकडील डी एन नगरला पूर्वेकडील मंडाळेशी जोडेल, बांद्रा, कुर्ला आणि चेंबूरमधून जाणार आहे. हा मेट्रो मार्ग मुंबईची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक महत्वाची भूमिका निभावणार आहे.
खऱ्या अर्थाने ही लाइन 2A सह विस्तीर्ण मेट्रो लाईन 2 कॉरिडॉरचा भाग बनत आहे. एकदा की हा मार्ग कार्यान्वित झाला की या भागातील नागरिकांचा प्रवास वेगवान होणार आहे. हा मेट्रो मार्ग दररोज किमान 10 लाख प्रवाशांना सेवा देईल, असा एक प्राथमिक अंदाज सुद्धा आहे.
ज्यामुळे या परिसरातील रहदारी कमी करण्यात मदत होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. MMRDA या मार्गाचे काम युद्धपातळीवर विकसित करीत आहे. याचे काम टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. मंडाले ते डायमंड गार्डन या भागाला MMRDA स्वतः अधिक प्राधान्य देत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान मुंबईतील इतर मेट्रो मार्गांप्रमाणेच हा सुद्धा मार्ग 25kV AC ओव्हरहेड इलेक्ट्रिक सिस्टमवर धावणार आहे अन या भागाला सुद्धा एक पर्यावरणपूरक जलद अन सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाची आन बाण अन शान म्हणजे मंडाळे डेपो अन हा डेपो या लाइन 2B मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं आपण म्हणू शकतो. मंडाळे डेपो बाबत सांगायचं झाल्यास हा महत्वाचा डेपो मानखुर्द येथील सरकारी मालकीच्या 31.4 हेक्टर जागेवर बांधला जात आहे.
दरम्यान या जागेचा सर्वोत्तम वापर व्हावा या अनुषंगाने डेपोमध्ये दुहेरी-डेकर रचना सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहे आणि या डेपोमध्ये कमाल 72 मेट्रो गाड्या ठेवता येतील अशी माहिती देण्यात आली आहे.