Mumbai Metro News : मुंबई मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधीच एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो ने मतदारांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
या बदलामुळे मतदारांना मतदानासाठी जाताना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. मेट्रोने उद्यासाठी अर्थातच मतदानाच्या दिवशी अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे.
या नियोजनामुळे मतदारांना मतदान केंद्रावर जाणे सोयीचे होईल आणि मतदान केंद्रावरून घरी परतणे सोयीचे होईल असे बोलले जात आहे.
दरम्यान आता आपण मुंबई मेट्रो ने घेतलेला निर्णय नेमका कसा आहे, मेट्रोच्या कीती अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार, किती वाजेपर्यंत मेट्रो धावणार ? यासंदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं आहे मुंबई मेट्रोचे नियोजन ?
महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) उद्या मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मतदानाच्या दिवशी प्रवासाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रोसेवा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील अशी माहिती प्रशासनाने देण्यात आली आहे.
२० नोव्हेंबरला पहिली मेट्रो पहाटे ४ वाजता गुंदवली, दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) स्थानकांवरून सुटेल. तर शेवटची मेट्रो २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री म्हणजे २१ नोव्हेंबरला १ वाजता सुटणार आहे.
एकूण १९ अतिरिक्त फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण दैनिक फेऱ्या २४३ वरून २६२ फेऱ्यांपर्यंत वाढतील. नियमित सेवा सकाळी ०५:२२ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतील.
नक्कीच मेट्रोच्या या वाढीव फेऱ्यांमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. मेट्रोच्या वेळापत्रकात झालेला हा महत्त्वाचा बदल मुंबईकरांसाठी दिलासादायी ठरेल असे म्हटले जात आहे.
यामुळे निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या आणि मतदानासाठी बाहेर जाणाऱ्या मतदारांना या वाढीव फेऱ्यांमुळे निवडणुकीसाठी सहजच जाता येईल असा विश्वास व्यक्त होतोय.