मुंबईकरांसाठी खुशखबर! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता मुंबईमधील ‘या’ मेट्रो मार्गाचे काम होणार जलद, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
Pune Metro Railway News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक थोडीशी दिलासादायक अन आनंदाची बातमी बातमी समोर येत आहे. वास्तविक शहरातील आणि उपनगरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गहन बनत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तसेच इतर मुख्य प्राधिकरणाकडून, महापालिकेकडून शहरात आणि उपनगरात वेगवेगळी रस्ते विकासाची, रेल्वेची/मेट्रोची, भुयारी मार्गांची, तसेच ऍलिव्हटेड कॉरिडॉर, कोस्टल रोड यांसारखी वेगवेगळी कामे केली जात आहेत. या सर्व प्रकल्पांचा उद्देश मात्र एकच तो म्हणजे वाहतूक कोंडी फोडणे.

हे पण वाचा :- नागपूरमध्ये नोकरीची संधी! एअर इंडिया एअर सर्विसेसकडून ‘या’ पदासाठी भरती जाहीर, 10वी पास उमेदवारांनाही नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड

दरम्यान आता मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेट्रो मार्ग क्रमांक चारबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. मेट्रो मार्ग चार मधील वडाळा ते कासारवडवली याबाबत मुंबई उच्च न्यायालयातून एक मोठी माहिती समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या मेट्रो मार्गाचे काम थांबवता येणार नाही हा एक सार्वजनिक हिताचा प्रकल्प आहे असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मेट्रोमार्ग प्रकल्पा विरोधात इंडो निप्पोन केमिकल कंपनी लिमिटेड, मेकर भवन आणि घाटकोपर पूर्व येथील श्री यशवंत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग लिमिटेडने आपल्या खाजगी प्रॉपर्टी मधून मेट्रोमार्ग चार जात असल्याने हा संपूर्ण प्रकल्प रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती; ‘या’ लोकांना नोकरीची संधी, जाहिरात पहा

यामध्ये प्रामुख्याने एमएमआरडीएने अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भूसंपादन करताना कायद्याचे उल्लंघन केले असून त्यांना भूसंपादन करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले गेले होते. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक पूर्वपरवानग्या प्राधिकरणाने घेतल्या नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात या कंपन्यांच्या माध्यमातून केला गेला. मात्र न्यायालयाने हा सर्व युक्तिवाद फेटाळून लावला आणि हा एक सामाजिक हिताचा प्रकल्प असल्याचे निरीक्षण नोंदवले. निश्चितच यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे.

हे पण वाचा :- यंदा उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! ‘या’ कारणामुळे दरात तेजी राहू शकते, जाणकारांचा अंदाज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe