Mumbai Metro News : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून 14 मेट्रो मार्ग विकसित केले जात असून यापैकी काही मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत.
मेट्रोशी संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत मुंबई शहरात आणि उपनगरात एकूण चार मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबईला लवकरच पाचवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवासाची वेगवान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता मुंबईमध्ये सुरू होणाऱ्या पाचव्या मेट्रो मार्गिकेबाबत आज आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

हा मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत
येत्या काही महिन्यांनी मेट्रो 2 ब हा मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. मुंबईत सुरू होणारा हा पाचवा मेट्रो मार्ग प्रकल्प राहणार असून या प्रकल्पाचा डायमंड – मंडाले हा 5.3 किलोमीटर लांबीचा आणि पाच स्थानक असणारा टप्पा येत्या काही दिवसांनी मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.
डिसेंबर 2025 च्या अखेरीस हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार असून यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत एक नवीन क्रांती आपल्याला पाहायला मिळू शकते. या भागातील नागरिकांचा प्रवास या मेट्रो मार्गामुळे अगदीच गतिमान होईल अशी आशा आहे. आता आपण मुंबई सुरू होणारा हा पाचवा मेट्रो मार्ग नेमका कसा आहे याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
कसा आहे मेट्रो 2 ब
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मेट्रो 2 ब हा मुंबईतील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प असून हा मेट्रो मार्ग दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ मार्गाशी जोडला जाणार आहे. आता ही मेट्रो 2 ब मार्गिका अंधेरी पश्चिम ते मंडाले दरम्यान प्रवासासाठी नव्या सोयीसह सज्ज होत असल्याची माहिती जाणकार लोकांकडून समोर आली आहे.
या मार्गाबाबत बोलायचं झालं तर याची लांबी ही जवळपास 23 किलोमीटर इतकी असून यावर 22 स्थानके विकसित केली जात आहेत. यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी होऊ शकते असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय.
या मार्गिकेचे कामाबाबत बोलायचं झालं तर याचे काम दोन टप्प्यांत सुरू आहे. दरम्यान या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा डायमंड गार्डन ते मंडाले असा असून हाच पहिला टप्पा येत्या काही महिन्यांनी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
तसेच या मार्गाचा दुसरा टप्पा डायमंड गार्डन ते अंधेरी पश्चिम असा आहे. जो की पहिल्या टप्प्याच्या संचालनानंतर सुरू केला जाईल. आतापर्यंत या मेट्रो मार्ग प्रकल्पा अंतर्गत मंडाले येथील 31 एकर जागेवर कारशेड विकसित करण्यात आले आहे.
या मेट्रोच्या कारशेडची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे एकावेळी 72 मेट्रो गाड्यांची व्यवस्था होऊ शकते अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब अशी की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कारशेडचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे आणि यावर चाचण्यांना सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे या मेट्रोमार्गावर 16 एप्रिल 2025 रोजी पहिली चाचणी झाली. या दिवशी डायमंड गार्डन ते मंडाले यादरम्यान मेट्रोने पहिली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
या मार्गावरील पहिले चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता या मार्गावर नियमित मेट्रो चाचण्या व सिग्नल, सुरक्षा प्रणालींची तपासणी सुरू राहणार असे अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे. यामुळे हा मेट्रोचा मार्ग डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होऊ शकतो असा अंदाज आहे.