कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त 45 मिनिटात ! ‘या’ मेट्रो मार्गाच्या कामाला आज पासून सुरुवात

Published on -

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध मेट्रो मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे शहरासहित उपनगरातील प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे.

दरम्यान कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई मधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्ग 5 च्या विस्तारित मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या कल्याण – डोंबिवली – तळोजा मेट्रो १२ च्या कामाला आजपासून अर्थातच 3 मार्च 2024 पासून सुरुवात झाली आहे.

हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला आहे.

हा मेट्रो मार्ग 20.75 किलोमीटर लांबीचा राहणार असून यामुळे कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास फक्त आणि फक्त 45 मिनिटात होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.

दरम्यान, या नव्याने विकसित होणाऱ्या मेट्रो मार्गात 19 नवीन मेट्रो स्थानक विकसित होणार आहेत. या मार्गामुळे ठाणे आणि नवी मुंबई ही शहरे जोडली जाणार आहेत.

या शहरांमध्ये नागरिकांचा प्रवास या मेट्रो मार्गामुळे खूपच जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे. आजपासून सुरू करण्यात आलेले मेट्रो प्रकल्पाचे काम गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीकडून पूर्ण केले जाणार आहे.

दरम्यान आता आपण या मेट्रोमार्गात कोणती 19 स्थानके विकसित होणार आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

कोणकोणती मेट्रो स्थानके तयार होणार

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या मेट्रो मार्ग प्रकल्पात कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलोगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा ही नवीन मेट्रो स्थानके विकसित होणार आहेत. या मेट्रो मार्गामुळे या परिसरातील नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत गतिमान होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe