Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईला लवकरच आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या ही कोणापासून लपून राहिलेली नाही. शहरातील वाहतूक कोंडी पाहता आता शहरातील विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहे तसेच मेट्रोचा देखील विस्तार केला जात आहे.
दरम्यान शहरातील मेट्रोमार्ग तीन बाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मेट्रो मार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईची मेट्रो-3 ज्याला अॅक्वा लाईन म्हणूनही ओळखली जाते.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत, मेट्रो लाईन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पर्यंत उपलब्ध होती. मात्र आता या मेट्रो लाईन चा दुसरा टप्पा म्हणजेच बीकेसी ते वरळी हा दुसरा टप्पा देखील सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला होणार आहे.
या मार्गावर 10 एप्रिल रोजी मेट्रो दाखल होईल अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. वास्तविक, मुंबई मेट्रो-3 अॅक्वा लाईनचा 12.69 किमीचा पहिला टप्पा हा गेल्या वर्षी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता.
7 ऑक्टोबर 2024 रोजी हा पहिला टप्पा खुला करण्यात आला. या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील स्थानकांमध्ये बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) टी-1, सहार रोड, सीएसएमआयए टी 2, मरोळ नाका, अंधेरी, सीईपीझेड आणि आरे कॉलनी जेव्हीएलआर (ग्रेडमधील एकमेव स्टेशन) यांचा समावेश आहे.
दरम्यान आता या मार्गाचा दुसरा टप्पा देखील सुरू होणार आहे. या मेट्रोचा दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी असा असेल. या दुसऱ्या टप्प्यात धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक हे स्थानके विकसित केली जाणार आहेत.
तसेच या मेट्रो मार्गाच्या तिसऱ्या टप्प्यात सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड या स्थानकांचा समावेश राहणार असून या मेट्रो मार्गाचा तिसरा टप्पा देखील याच वर्षात खुला होऊ शकतो असा एखांदा समोर येतोय.
जून महिन्यात या मेट्रो मार्गाचा तिसरा टप्पा खुला होण्याची दाट शक्यता असली तरी देखील प्रत्यक्षात जून महिन्यात हा संपूर्ण मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होईल हे सांगणे थोडे कठीण आहे.