मुंबईकरांसाठी खुशखबर ; पुढल्या महिन्यात सुरु होणार ‘हा’ मेट्रो मार्ग !

Published on -

Mumbai Metro News : देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना मोठा फटका बसतोय. दरम्यान मुंबई मधील हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मेट्रो सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईमधील मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण देखील सुरू आहे. अशातच आता मुंबईमधील मेट्रोमार्ग 3 बाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्वा लाईन मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच मेट्रो लाईन- 3 च्या दुसऱ्या फेजबाबत माहिती दिली होती.

या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच या मार्गाचा दुसरा भाग वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचे सुतोवाच फडणवीस यांनी केले होते. यानंतर आता मेट्रो लाईन 3 च्या फेज 2 च्या उद्घाटनाच्या संभाव्य तारखेबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत.

कधी सुरू होणार हा मेट्रो मार्ग

मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये हा मेट्रो मार्ग सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या मार्गावर मेट्रो धावणार असल्याचे बोलले जात आहे. मेट्रो लाईन 3 चा दुसरा टप्पा हा आरे ते आचार्य अत्रे चौक (वरळी) यांना जोडणारा मुंबईचा पहिला भूमिगत मेट्रो कॉरिडॉर असेल.

हा कॉरिडॉर सुमारे 22 किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर शहरातील अनेक भागांमधील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची तारीख मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

या मार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच बीकेसी ते वरळी दरम्यानचा टप्पा 10 एप्रिल पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या मेट्रो मार्गाचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरू आहे.

हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर लेडी जमशेदजी रोड आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड सारख्या जड वाहतुकीच्या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धारावी, दादर, सिद्धिविनायक, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी-कुर्ला रोड, बीकेसी आणि वरळी यासारख्या भागातील नागरिकांना देखील या मेट्रो मार्गाचा फायदा होणार आहे.

सेंट मायकल चर्च, हजरत मखदुम फकीह अली महिमी तीर्थक्षेत्र, शीतलादेवी मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिर इत्यादी धार्मिक स्थळांना भेट देणे सुद्धा या मार्गामुळे पूर्वीपेक्षा अधिक सोयीचे होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe