Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये मेट्रोच्या आगमनामुळे सर्वसामान्यांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. मेट्रोमुळे मुंबई पुण्यातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. यामुळे या शहरांमध्ये सातत्याने मेट्रोचे नेटवर्क वाढवण्यावर प्रशासनाकडून लक्ष केंद्रित केले जात आहे.
दरम्यान आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजधानीमधील नागरिकांचा प्रवास येत्या काळात आणखी सुपरफास्ट होणार आहे. कारण की महाराष्ट्राच्या राजधानीला तसेच आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन च्या माध्यमातून आता वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या प्रस्तावित मेट्रो मार्गाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अंतरिम सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे.
या प्रक्रिया अंतर्गत ज्या कंपनीला अंतरिम सल्लागार नियुक्त केले जाईल त्याच्या माध्यमातून नियोजन, डिझाइन, बांधकामाचे निरीक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण अशी महत्त्वाची कामे पूर्ण केले जातील. सल्लागार प्रकल्पाचे काम वेळेत आणि स्थापित मानकांनुसार काम होत आहे की नाही याच्या निरीक्षणाची सुद्धा जबाबदारी संबंधित सल्लागाराकडे राहील.
प्रकल्पासाठी निविदा तयार करण्यासाठी देखील सल्लागाराकडून प्राधिकरणाला मदत केली जाणार आहे. पण बांधकामाचे बारीक निरीक्षण करणे हे सल्लागाराचे प्रमुख काम राहणार आहे. दरम्यान सल्लागाराची नियुक्ती झाली की मग इतर निविदा प्रक्रिया पुढे सरकणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की एमएमआरसीने या नियुक्तीसाठी निविदा मागवल्या आहेत. यासाठी 4 नोव्हेंबर रोजी प्री-बिड बैठक होणार आहे. तसेच कंपन्या 3 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतील. दरम्यान या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास वेगवान होणार आहे.
शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग संपन्न झाल्यानंतर आता या दुसऱ्या प्रकल्पाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून हा प्रकल्प देखील नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाकडून तयारी करण्यात आली आहे.