मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरातील ‘या’ भागाला लवकरच मिळणार मेट्रो, कसा असणार नवा मेट्रो मार्ग ?

मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हीच वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. दरम्यान या वर्षाच्या शेवटी मुंबईकरांना आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे.

Published on -

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबईला लवकरच एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. मुंबई पुणे नागपूर या सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.

मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबईतील अनेक भागांमध्ये मेट्रो सुरु करण्यात आली आहे. तसेच अजूनही अनेक मेट्रो मार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच आता मुंबईला एक नवीन मेट्रो मार्ग मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत मुंबईतील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग सुरू होईल आणि यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असेल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो 9 चा पहिला टप्पा सुरू केला जाऊ शकतो असे बोलले जात आहे.

दहिसर मीरा-भाईंदर मेट्रो मार्ग हा जवळपास 13.6 किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग प्रकल्प असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच सर ते काशिगाव हा साडेचार किलोमीटर लांबीचा टप्पा येत्या वर्षा अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. आज बुधवार 14 मे 2025 पासून या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यावर चाचणी सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ट्रायल रनला सुरुवात 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज 14 मे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग नऊच्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन सुरू करण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता मिरा रोड मेट्रो स्थानकावरून ट्रायल रनला सुरवात झाली आहे. 

कसा आहे मेट्रो मार्ग? 

मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांसाठी महत्वाची अशी ही मार्गिका दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ आणि दहिसर-गुंदवली मेट्रो 7 शी जोडली जाणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील रुळ, सिग्नल आणि विद्युत प्रवाहाचे काम पूर्ण झाले असून आता टप्प्याटप्प्याने या मार्गांवरील मेट्रो सेवेला सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाकडून आखण्यात आले आहे.

मेट्रो मार्ग नऊच्या टप्पा 1 अंतर्गत दहिसर-काशीगाव दरम्यान आज पासून चाचणी सुरू होणार असून ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर एमएमआरडीएमार्फत अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आरडीएसओ आणि सीएमआरएसकडून आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळवले जाईल.

दरम्यान ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल आणि डिसेंबर मध्ये या मेट्रो मार्गाच्या पहिला टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई उपनगरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News