मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ महत्त्वाच्या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा विस्तार होणार, Metroचा प्रवास होणार सुसाट, पण….

Ajay Patil
Published:
Mumbai Metro Railway News

Mumbai Metro Railway News : मुंबई आणि उपनगरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सदृढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी अधिका-अधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा जेणेकरून वाहतूक कोंडीतून सुटका होईल आणि प्रदूषणाचा स्तर नियंत्रणात ठेवला जाईल यासाठी प्रयत्न जोरात आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे.

दहिसरला मीरा भाईंदरशी देखील मेट्रो मार्गे कनेक्ट केले जाणार आहे. आता दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो मार्ग 9 बाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गाचा विस्तार आता उत्तनपर्यंत केला जाणार आहे. याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. मात्र याचा डीपीआर अजून तयार झालेला नाही.

हे पण वाचा :- कोरोनात नोकरीं गेली सुरु केली शेती ! 30 गुंठ्यात ‘या’ पिकाची लागवड केली अन झाली 10 लाखाची कमाई, वाचा ही यशोगाथा

विशेष म्हणजे डीपीआर तयार नसतानाच प्रशासनाकडून ही मार्गिका उत्तनपर्यंत नेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मेट्रो 9 प्रकल्प हा दहिसर पूर्व ते भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमपर्यंत प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रकल्प जवळपास साडे अकरा किमी लांबीचा आहे. या प्रकल्पामुळे निश्चितच या दोन्ही स्थळांना थेट कनेक्टिव्हिटी लाभणार आहे.

यामुळे प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गासाठी आतापर्यंत आवश्यक असलेल्या 840 खांबांची उभारणी देखील झाली आहे. मार्गिकेचे जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. पण अद्याप प्रकल्पासाठीच्या कारशेडबाबत स्पष्टता आलेली नाही. वास्तविक, या प्रकल्पासाठीचे कारशेड हे नेताजी सुभाष चंद्र बोस स्टेडियम पासून 3 किलोमीटर अंतरावर वसलेल्या राई या गावात नियोजित होते.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार वादळी पाऊस; हवामान विभागाची माहिती

पण तेथील ग्रामस्थांनी याचा विरोध केला, यामुळे आता हे कार शेड त्यापुढे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तन येथे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आता या मेट्रो मार्ग प्रकल्पाचे शेवटचे स्थानक ते उत्तनपर्यंत कशी मार्गीका तयार केली जाणार आहे? याबाबतचा डीपीआर तयार करणे आवश्यक आहे. परंतु यासाठी DPR तयार झालेला नाही मात्र प्रशासनाकडून याचे काम सुरू करण्यात आले आहे.

डीपीआर तयार नसला तरी देखील जमीन मोजणीचे काम सुरू झाल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. एकंदरीत, डीपीआरबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसली तरीदेखील याचे काम सुरू झाले आहे. यामुळे लवकरच या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होईल आणि या परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- ठाणेकरांना लवकरच मिळणार गिफ्ट ! ‘या’ तीन मार्गांवर सुरु होणार एसी लोकल; रूटची माहिती इथं वाचा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe