Mumbai Metro : मुंबईतील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे लवकरच राजधानीला एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. खरंतर राजधानीतील काही भाग आता मेट्रोने जोडले गेले आहेत आणि यामुळे राजधानीमधील वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सुपरफास्ट झाली आहे.
मुंबई शहरासोबतच मुंबई उपनगराला देखील मेट्रोची भेट मिळाली आहे. दुसरीकडे, मुंबई मेट्रोच्या विस्ताराला सुद्धा गती दिली जात आहे. अशातच आता मुंबई मेट्रो लाईन 3 बाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो लाईन तीनच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या 9.8 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचा येत्या काही दिवसांनी शुभारंभ होणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार मार्च महिन्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता होती. मात्र, आता मार्च महिने संपण्यास अवघे तीन ते चार दिवस बाकी आहेत यामुळे मार्च महिन्यात हा मार्ग पुलाव होईल का हे पाणी उत्सुकतेचे राहणार आहे.
पण या नवीन मार्गामुळे हजारो प्रवाशांसाठी वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होईल. द्रुतगती, वातानुकूलित आणि आरामदायक प्रवासाचा हा पर्याय मुंबईकरांसाठी खूपच फायद्याचा राहणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक वेगवान होणार आहे.
कसा आहे प्रकल्प ?
मुंबई मेट्रो लाईन 3 बाबत बोलायचं झालं तर हा मार्ग संपूर्ण भूमिगत म्हणजेच जमिनीखालून गेलेला आहे. या मार्गाची लांबी 33.5 असून हा मार्ग शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अगदीच महत्त्वाचा ठरणार आहे.
या नव्याने सुरू होणाऱ्या मेट्रोच्या टप्प्यात धारावी, दादर, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. या मार्गावर धारावी, शितलादेवी मंदिर, दादर मेट्रो, सिद्धिविनायक, वर्ली आणि आचार्य अत्रे चौक अशी सात नवीन स्थानके उभारण्यात आली आहेत.
किती असणार भाडं?
मीडिया रिपोर्टनुसार, या नव्याने सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गावर गर्दीच्या वेळी दर सात मिनिटांनी आणि अन्य वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध राहणार असून यामुळे या भागातील नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे आरे ते वरळी असा प्रवास अवघ्या 36 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मेट्रो मार्गावर प्रवास करण्यासाठी आवश्यक तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर याचे भाडे 10 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत असेल.
दक्षिण मुंबईतील दळणवळण सुलभ करण्यासाठी या मेट्रोचा मोठा वाटा असणार आहे. एकूण 221 फेऱ्यांसह ही सेवा मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुलभ करेल. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सेनापती बापट मार्गासारख्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
मेट्रो लाईन 3 इतर मेट्रो मार्ग, रेल्वे आणि बस सेवांशी जोडली गेल्याने संपूर्ण मुंबईत अखंडित प्रवास शक्य होणार आहे. पुढील टप्प्यात हा मार्ग कुलाब्याच्या कफ परेडपर्यंत विस्तारला जाणार असून, मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
हा प्रकल्प मुंबईतील विशेषता दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढू शकतो. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईमधील जनतेला साहजिकच मोठा दिलासा मिळणार आहे.