म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4 हजार 83 घरांसाठी सोमवारी निघणार जाहिरात; कोणत्या भागातील घरांचा राहणार समावेश? किंमत किती, पहा….

Ajay Patil
Published:
Mumbai Mhada News

Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हाडाकडून. म्हाडा ने दिलेल्या माहितीनुसार मुंबई मंडळाकडून सोमवारी अर्थातच 22 मे 2023 रोजी 4083 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.

म्हणजेच सोमवारी या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2019 मध्ये घर सोडत काढली होती. आता तब्बल चार वर्षानंतर मुंबई मंडळाच्या माध्यमातून घरांची लॉटरी जाहीर होणार असल्याने या सोडतिला नागरिकांकडून विशेष प्रतिसाद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान आज आपण मुंबई मंडळाकडून कोणत्या भागातील घरांसाठी ही सोडत जारी होणार आहे तसेच या घरांची किंमत किती राहील याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढला; आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार 42 टक्के DA, वाचा सविस्तर

कोणत्या भागातील घरांचा राहणार समावेश?

म्हाडा मुंबई मंडळाकडून जारी होणाऱ्या या नवीन सोडतीमध्ये दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू आणि अंधेरी यांसारख्या इत्यादी मुंबईमधील प्रकल्पांच्या घरांचा समावेश राहणार आहे.

कस राहणार वेळापत्रक?

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून चार हजार 83 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. 22 मे 2023 रोजी या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. विशेष म्हणजे त्याच दिवसापासून या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच 26 जून 2023 पर्यंत या घर सोडतीसाठी इच्छुक नागरिकांना आपला अर्ज अनामत रकमेसह सादर करता येणार आहे.

यानंतर मग पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध होईल आणि 18 जुलै 2023 रोजी या घर सोडतची लॉटरी निघणार आहे. ही लॉटरी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात काढली जाणार असून या दिवशी हजारो नागरिकांचे मुंबईमधील घर घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता शहरात वंदे भारतच्या धर्तीवर ‘या’ लोकल ट्रेन सुरु होणार, रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली, कसा असणार प्रकल्प?

किमती किती राहणार?

या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या घरांच्या किमतीबाबत अजून अधिकारीक माहिती हाती आलेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या सोडतीत पहाडी गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेच्या अत्यल्प उत्पन्न गटात समाविष्ट घरांची 33 लाख 44 हजार रुपये एवढी किंमत राहणार आहे.

दरम्यान मुंबई मध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून म्हाडाच्या घरांच्या किमती सामान्य लोकांना परवडणाऱ्या असतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. यामुळे आता या घरांच्या किमती किती राहतील याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी आनंदी बातमी ! ‘या’ मार्गांवर इलेक्ट्रिक शिवनेरी बस सूरू, संपूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर, पहा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe