मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी !

Published on -

Mumbai Nagpur Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध महामार्ग प्रकल्पांचे कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही महामार्ग प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. मुंबई ते नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम देखील अजूनही सुरूच आहे.

हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे.

सध्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू असून इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा येत्या काही दिवसांनी सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

इगतपुरी ते आमने या शहात्तर किलोमीटर लांबीचा त्याचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांनी हा शेवटचा टप्पा देखील वाहतुकीसाठी सुरू होईल आणि यानंतर मुंबई ते नागपूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.

या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होतोय. असे असतानाच आता या महामार्ग प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे.

खरंतर एक एप्रिल 2025 पासून समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकचा टोल द्यावा लागणार आहे. तीन वर्षानंतर पहिल्यांदा समृद्धी महामार्गाचे टोल दर सुधारित केले जात आहेत.

यामुळे मात्र समृद्धी महामार्गाचा प्रवास महागणार आहे. दरम्यान आता आपण समृद्धी महामार्गाने प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना किती टोल भरावा लागू शकतो याबाबत माहिती जाणून घेऊयात.

समृद्धी महामार्गावर आता किती टोल भरावा लागणार?

सध्या समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी कार, जीप किंवा हलकी मोटार वाहनचालकांना 1.73 रुपये प्रति किलोमीटर इतका टोल द्यावा लागणार आहे. मात्र आता पुढच्या महिन्यापासून कार चालकांना 1.73 रुपयांऐवजी 2.06 रुपये भरावे लागतील.

हलके व्यावसायिक वाहन आणि मिनी बसला प्रत्येक किलोमीटरसाठी 2.79 रुपयांऐवजी 3.32 रुपयांपर्यंत टोल द्यावा लागणार आहे. बस आणि ट्रकला 5.85 रुपयांऐवजी 6.97 रुपयांचा टोल भरावा लागेल. तसेच पुढच्या महिन्यापासून ओव्हर साईज वाहनास 13.30 रुपयांचा टोल भरावा लागेल.

समृद्धी महामार्गावर कार चालकांना किती टोल भरावा लागणार?

मुंबई – नागपुर – 1444.06 रुपये
मुंबई- शिर्डी – 372.86 रुपये
मुंबई – इंगतपुरी – 156.56 रुपये
नागपुर – शिर्डी – 1071.2 रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe