Mumbai Nagpur Greenfield Expressway : मुंबई नागपूर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे अर्थातच हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गेल्या वर्षी 11 डिसेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी खुला झाला असून या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
दरम्यान आता या महाराष्ट्रासाठी अतिमहत्त्वाच्या आणि बहुचर्चित अशा महामार्गाविषयी एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा महामार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि प्रवाशांना प्रवास करताना सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक मोठ काम करण्यात येणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, महामार्गावर बचाव कार्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून अजून 26 वाहने दिले जाणार आहेत. रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मोपलवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती सार्वजनिक केली आहे.
मोपलवार यांनी यासंदर्भात नुकतीच एक महत्त्वपूर्ण अशी बैठक देखील घेतली आहे. यामध्ये संबंधित विभागातील अधिकारी यांचा समावेश होता. खरं पाहता समृद्धी महामार्ग पोलिसांनी गस्त वाढवण्यासाठी अजून वाहनांची मागणी केली होती. अशा परिस्थितीत त्यांना 15 चार चाकी वाहने दिली जाणार आहेत. याशिवाय परिवहन विभागाने त्यांची खरेदी होईपर्यंत काही इंटरसेप्टर वाहने देण्याची मागणी केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ती मान्य करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या प्रत्येक पॅकेज मागे एक अशा पद्धतीने 11 वाहने त्यांना दिले जाणार आहेत. म्हणजेच एकूण 26 नवीन वाहने समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी आणि बचाव कार्यासाठी कार्यरत होणार आहेत. दरम्यान आम्ही आपणास सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावर 15 ॲम्बुलन्स ची सेवा आधीच पुरवली जात आहे.
यासाठी 108 टोल फ्री क्रमांक जो की संपूर्ण राज्यासाठी आहे तोच क्रमांक राहणार आहे. याशिवाय जलद प्रतिसाद वाहने म्हणून 21 वाहने बेड्यात सामील आहेत. तसेच गस्त लगाववण्यासाठी प्रत्येक पॅकेज मागे एक अशा पद्धतीने 11 वाहने ऑलरेडी या समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी 24 तास अलर्ट वर आहेत.
निश्चितच अजून नव्याने 26 वाहने महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि बचाव कार्यासाठी सामील होणार असल्याने हा मार्गावरील प्रवास अजूनच सुरक्षित बनणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही.