Mumbai-Nagpur Railway : तुम्हीही राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान प्रवास करता का अहो मग आजची बातमी तुमच्यासाठी फारच कामाची ठरणार आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि याच उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत.
मुंबई ते नागपूर या मार्गावर देखील रेल्वे कडून स्पेशल गाडी सुरू केली जाणार असून यामुळे विदर्भातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सुरू होणाऱ्या मुंबई नागपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या नव्या ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार ? ही स्पेशल गाडी कधीपासून सुरू होणार याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.

नव्या स्पेशल गाडीचे वेळापत्रक कसे आहे?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मुंबई आणि नागपूर दरम्यान विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी प्रवाशांसाठी अतिरिक्त प्रवास सुविधा पुरवेल तसेच उन्हाळी गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
या स्पेशल गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक ०२१३९, ही द्विसाप्ताहिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – नागपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन मुंबईहून ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत चालवली जाणार आहे. ही द्वि साप्ताहिक गाडी आहे म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
ही गाडी या काळात मंगळवार आणि रविवार रात्री १२.२० वाजता मुंबई येथून रवाना होणार आणि नागपूर येथे दुपारी ३.३० वाजता या गाडीचे आगमन होणार आहे. परतीच्या प्रवासा बाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक ०२१४० अर्थातच नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ही विशेष एक्सप्रेस ट्रेन नागपूरहून ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी आठवड्यातून दोन सोडली जाईल. या लिमिटेड पिरेड मध्ये ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि रविवारला रात्री आठ वाजता उपराजधानी नागपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे या गाडीचे दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता आगमन होणार आहे.
या स्पेशल गाडीमुळे मुंबई ते नागपूर या दरम्यान चा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या मार्गावर नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आणि याचमुळे ही स्पेशल गाडी सुरू करण्यात आली असून या विशेष गाडीमुळे या मार्गांवरील अतिरिक्त प्रवाशांची गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.