मुंबई ते नागपूरचा प्रवास होणार आणखी जलद ! सुरु होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन; केव्हा सुरु होणार, ट्रेनला कुठ राहतील थांबे, पहा……

Ajay Patil
Published:
Mumbai Nagpur Train

Mumbai Nagpur Train : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. यादोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी भारतीय रेल्वे कडून अनेक एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. मात्र आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत मध्य रेल्वेच्या माध्यमातून यातिरिक्त गर्दीवर तोडगा म्हणून एक विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. साहजिकच या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांना या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना सोयीचे होणार आहे, प्रवाशांचा प्रवास मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे निश्चितच सुलभ होणार आहे. दरम्यान आज आपण या रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत तसेच ही रेल्वे कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबेल याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी सोने पे सुहागा ! ‘या’ मेट्रो मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर, आता 40 महिन्यांच्या आत पूर्ण होणार मेट्रो मार्गाचे काम

मुंबई ते नागपूर दरम्यान सुरू झालेल्या विशेष ट्रेनचे वेळापत्रक

मुंबई ते नागपूर दरम्यान अतिरिक्त प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर रेल्वे स्टेशन पर्यंत अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय यावेळी घेतला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. 02139 सुपरफास्ट स्पेशल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्टेशन वरून 16 एप्रिल रोजी 00.20 वाजता नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि या ट्रेनचे त्याच दिवशी 15.32 वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवर आगमन होणार आहे.

हे पण वाचा  :- गुंतवणूकदारांसाठी ‘हा’ स्टॉक ठरला कुबेर का खजाना ! फक्त 6 महिन्यात 2 लाखाचे बनवलेत 30 लाख, पहा….

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर स्पेशल ट्रेन चे थांबे

आलेल्या माहितीनुसार सीएसएमटी ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या स्पेशल ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तजापूर, बडनेरा धामणगाव आणि वर्धा या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

केव्हापासून सुरू होणार तिकीट बुकिंग?

ही ट्रेन 16 एप्रिल पासून सुरू होणार असून या ट्रेन साठी आज अर्थातच 14 एप्रिल 2023 पासून तिकीट बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे पण वाचा :- कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री शिंदे घेणार मोठा निर्णय; ‘या’ दिवशी महागाई भत्त्यात होणार 4% वाढ, तारीख झाली फिक्स, पहा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe