मुंबई – नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट ! 55 हजार कोटी रुपयांचा ‘हा’ महामार्ग प्रकल्प पुढील आठवड्यात खुला होणार

राज्याला लवकरच 55 हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित होणारा एक महत्त्वकांक्षी रस्ते विकासाचा प्रकल्प पुढील आठवड्यात सुरू होईल, याचे उद्घाटन केले जाईल अशी बातमी समोर येत आहे.

Published on -

Mumbai Nashik Travel : पुढील आठवड्यापासून मुंबई ते नाशिक हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे कारण की पुढील आठवड्यात राज्याला एका महामार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर काल अर्थातच 9 मे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेतील दुसरा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू केला.

बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या दुसऱ्या टप्प्याचे काल फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले आणि आजपासून हा टप्पा सर्वसामान्य मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. खरे तर काल समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुद्धा सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार होता.

मात्र या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण कधी होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय.

कधी होणार समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण ? 

नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केल्या जात असून या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत नागपूर ते मुंबई दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा ग्रीन फील्ड एक्सप्रेस विकसित केला जात आहे.

आतापर्यंत समृद्धी महामार्ग प्रकल्प अंतर्गत 625 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. मात्र अजून समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही.

यामुळे या प्रकल्पाचे उद्घाटन कधी होणार हाच सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होतोय. खरे तर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम कधीच पूर्ण झाले आहे. मात्र अजून हा शेवटचा टप्पा अधिकृत रित्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला नाही.

दुसरीकडे या शेवटच्या टप्प्यावर बेकायदेशीर रित्या वाहतूक सुरू झाली आहे. साहजिकच त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उभा राहत आहे. खरे तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा एक मे 2025 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाईल असे म्हटले जात होते मात्र तसे काही घडले नाही.

त्यानंतर दोन मे ची तारीख समोर आली आणि महत्वाचे म्हणजे या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील असे बोलले जाऊ लागले. पण दोन मे 2025 रोजीचा मुहूर्त पण हुकला आणि यानंतर नऊ मे 2025 रोजी या टप्प्याचे लोकार्पण होईल अशी बातमी समोर आली पण आता हा सुद्धा मुहूर्त हुकला आहे.

पण पुढील आठवड्यात समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार अशी बातमी आता एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे. यामुळे आता पुढील आठवड्यात खरंच समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.

कसा आहे प्रकल्प ?

समृद्धी महामार्ग प्रकल्प अंतर्गत नागपूर ते मुंबई दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग विकसित करण्यात आला आहे. या महामार्गावरील 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहने धावू शकतात.

यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होईल असा दावा केला जातोय. या महामार्ग प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले असून यासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले होते आणि त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला.

पुढे 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. 2024 मध्ये या महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.

या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजे इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे बांधकाम सुद्धा पूर्ण झालेले आहे. मात्र अजून हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होऊ शकलेला नाही. खरे तर यापूर्वी 1 मे रोजी कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेतील दुसरा टप्पा आणि समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण केले जाईल अशी बातमी समोर आली होती.

मात्र मेट्रो टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने हा मुहूर्त चुकला. मात्र काल बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच आता समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अजूनही याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

त्यामुळे पुढील आठवड्यात समृद्धीचा शेवटचा टप्पा सुरू होणार की आणखी काही काळ वाट पहावी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. पण समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते नागपूर असा प्रवास वेगवान होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe