मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक बदलले ! नवीन वेळापत्रक लगेच चेक करा

ही विशेष ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, उरुळी, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्डुवाडी, बार्सी टाउन, उस्मानाबाद आणि हरंगुळ यासह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Published on -

Mumbai New Express Train : मध्य रेल्वेने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी-लातूर साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू केली आहे. खरंतर दरवर्षी सणासुदीच्या काळात मुंबई ते लातूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. हेच कारण आहे की मध्य रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लातूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे.

दरम्यान आता याच विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक मोठा बदल झाला आहे. या विशेष रेल्वे सेवेचा उद्देश सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या मागणीला सामावून घेण्याचा आहे.

सीएसएमटी-लातूर साप्ताहिक विशेष (गाडी क्र. ०११०५) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दर शनिवारी सकाळी ०.३० वाजता सोडली जाणार आहे अन ही गाडी त्यांच दिवशी लातूरला 11 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.

तसेच, परतीच्या प्रवासात ही गाडी म्हणजेच लातूर ते मुंबई विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्र. ०११०६) लातूरहून दर शनिवारी १६:३० वाजता सोडली जाणार आहे आणि सीएसएमटी मुंबईला दुसऱ्या दिवशी ०४:१० वाजता पोहचणार आहे.

या विशेष गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. अर्थातच मुंबई ते लातूर अशा चार आणि लातूर ते मुंबई अशा चार फेऱ्या होणार आहेत.

ही विशेष ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, उरुळी, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्डुवाडी, बार्सी टाउन, उस्मानाबाद आणि हरंगुळ यासह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या गाडीच्या रचनेबाबत बोलायचं झालं तर या विशेष ट्रेनमध्ये दोन AC-III टियर कोच, आठ स्लीपर क्लास कोच आणि आठ द्वितीय श्रेणीचे डबे असतील, ज्यामध्ये दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनचा समावेश असेल, जे प्रवासाची विविध प्राधान्ये आणि बजेटची पूर्तता करणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe